SBI मध्ये तुमचंही खात असेल तर जाणून घ्या महत्वाची अपडेट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ मार्च ।। जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे. एसबीआयची YONO, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल अॅप सर्व्हिस काही वेळेसाठी बंद राहणार आहे. एसबीआयचे ग्राहक उद्या म्हणजेच 23 मार्चला काही वेळेसाठी इंटरनेट बँकिंग सेवेचा वापर करु शकणार नाही. पण ग्राहक यादरम्यान युपीआय लाइट आणि एटीएमच्या माध्यमातून सेवांचा वापर करु शकतात.

एसबीआयने यासंबंधी परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितलं आहे की, इंटरनेटशी संबंधित सेवा 23 मार्च 2024 रोजी 1 वाजून 10 मिनिटांपासून ते 2 वाजून 10 मिनिटांपर्यंत उपलब्ध नसतील. बँकेने दिलेल्या माहितीनुसार ग्राहक इंटरनेट बँकिंग, योनो लाइट, योनो बिजनेस वेब आणि मोबाईल अॅप, योनो आणि युपीआयच्या सेवांचा वापर करु शकणार नाहीत. पण ग्राहक युपीआय लाइट आणि एटीएमच्या सेवांचा वापर करु शकतात.

समस्या आल्यास या क्रमांकावर साधू शकतात संपर्क
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक कोणतीही माहिती किंवा मदत मिळवण्यासाठी एसबीआयचा टोल फ्री क्रमांक 1800 1234 आणि 1800 2100 वर संपर्क साधू शकतात. यासह वेबसाईटवर जाऊनही सर्व प्रकारची माहिती मिळवू शकतात.

UPI चं काय?
ग्राहक दिलेल्या वेळेत युपीआयचा वापर करु शकणार नाहीत असं बँकेने सांगितलं आहे. पण युपीआय लाइटचा वापर करत पेमेंट करु शकतात. यासह एटीएम मशीनमधूनही पैसे काढू शकतात.

SBI चे किती ग्राहक आहेत?
तिसऱ्या तिमाहीच्या निकालात, एसबीआयने सांगितलं होतं की, त्यांच्या 22 हजार 400 पेक्षा अधिक शाखांचं नेटवर्क आहे आणि भारतात 81 हजारांपेक्षा अधिक BC आउटलेटसह 65 हजाराहून अधिक ATM/ADWM आहेत. यामधील 125 मिलियन ग्राहक इंटरनेट बँकिंग आणि 133 मिलियन ग्राहक मोबाईल बँकिंगचा वापर करतात. तिसऱ्या तिमाहीत, SBI मध्ये YONO च्या माध्यमातून 59 टक्के खाती उघडण्यात आली, ज्यावर एकूण 7.05 कोटींहून अधिक ग्राहक नोंदणीकृत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *