महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ नोव्हेंबर ।। शरद पवारांनी आंबेगावमध्ये पहिल्यादांच गद्दार शब्दाचा उल्लेख केलाय आणि तो सुद्धा पवारांचे मानसपूत्र अशी ओळख असलेल्या दिलीप वळसे पाटलांच्याविरोधात….राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेल्या दिलीप वळसे पाटलांनी पवारांची साथ सोडली.
त्यामुळे दुखावलेल्या पवारांनी आता थेट दिलीप वळसे पाटलांचा उल्लेख गणोजी शिर्के असा केलाय. गद्दारी करणाऱ्यांना 100 टक्के पराभूत करण्याचं आवाहन पवारांनी केलंय..तर आम्ही भाजपसोबत नव्हे तर सरकारमध्ये गेलो असं अजब प्रत्युत्तर वळसे पाटलांनी दिलंय.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच इतके आक्रमक झालेत. त्यातच पवारांनी दादांच्या पक्षाच्या नेत्यांना पराभूत करण्याचा निर्धार केलाय. मात्र पवारांनी दादांच्या पक्षाच्या नेत्यांविरोधात नेमकं काय म्हटलंय? पाहूयात.
पवारांचा नारा, गद्दारांना पाडा
परळी
बीडचा आदर्श उध्वस्त करणाऱ्यांना पराभूत करा
येवला
ज्यांनी नेतृत्वाला फसवलं त्यांचा पराभव करा
आंबेगाव
गद्दारी करणा-या गणोजीला सुट्टी नाही
खेड-आळंदी
तीन टर्म आम्ही इथल्या नेतृत्वाला संधी दिली, आता ती चूक करू नका
निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शरद पवारांनी आक्रमक होत अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांची कोंडी केलीय. त्यामुळे दादांच्या पक्षाचे नेते अस्वस्थ झालेत. मात्र पवारांचे हल्ले परतवून दादांच्या पक्षाचे नेते बालेकिल्ले राखणार की पवार गड भेदणार? याकडे लक्ष लागलंय.
