Horoscope Today दि. २६ फेब्रुवारी २०२६ ; आज सारासार विचार करूनच निर्णय घ्या. ……….. ..; पहा बारा राशींचं भविष्य — —

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २६ फेब्रुवारी २०२६ |

मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकार्‍यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इतरांवर छाप पडण्यात यशस्वी व्हाल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता. मुलांच्या खेळकरपणात रमून जाल. नाटक वा सिनेमा पाहण्याचे ठरवाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवसभर कामातच व्यग्र राहाल. सारखे मत बदलू नका. कामात एकसूत्रता ठेवावी. आततायीपणा करून चालणार नाही.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
जवळचा प्रवास हसत-खेळत होईल. भावंडांच्या सानिध्यात रमून जाल. नवीन लोकांशी संपर्क होईल. जोडीदाराचा शांत स्वभाव मनात भरेल. एककल्ली विचार करू नका.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
मानसिक चंचलता जाणवेल. गोडाधोडाचे पदार्थ चाखाल. भागीदारीत नवीन विचार मांडाल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. नातेवाईकांची नाराजी दूर करावी.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
दिवस घाईघाईत जाईल. घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. वैचारिक शांतता जपावी. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. उत्तम गृहसौख्य लाभेल.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
आशावादी दृष्टीकोन ठेवावा. घरात तुमचे प्रभुत्व राहील. सर्वबाबी अभ्यासूपणे जाणून घ्याल. वैवाहिक सौख्याच्या बाबीत समाधानी राहाल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
संभाषणाची आवड पूर्ण कराल. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावेत. कौटुंबिक समस्या सामोपचाराने हाताळाव्या. नोकरांचे सुख मिळेल.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
योग्य तर्काचा वापर कराल. आपले बौद्धिक ज्ञान उत्तमरीत्या वापराल. लहान प्रवास करावा लागेल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. काही गोष्टींचे एकवार चिंतन करावे.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
सामुदायिक वादात लक्ष घालू नका. जुनाट विचार करणे सोडून द्यावे. आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडाल. न डगमगता आपले विचार मांडाल. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
आपले प्रभुत्व दाखवाल. अचानक धनलाभ संभवतो. वैचारिक स्थिरता ठेवावी. नवीन मित्र जोडावेत. तुमच्या हातातील कलेचे कौतुक केले जाईल.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
कागदपत्रांची नीट छाननी करावी. फसवणुकीपासून सावध राहावे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खुश असाल. कामातील क्षुल्लक अडथळे दूर करावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *