Ration Card: १ एप्रिलपासून नवे नियम; ७० लाख कार्डधारकांवर गंडांतर?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दिनांक २६ फेब्रुवारी २०२६।।

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. १ एप्रिल २०२६ पासून रेशन कार्डच्या पात्रतेचे निकष कडक करण्यात येणार असून, सुमारे ७० लाख रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी अधिक काटेकोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्दिष्ट एकच—मोफत धान्य योजनेचा लाभ खऱ्या गरजूंनाच मिळावा.

उत्पन्न मर्यादा आणि मालमत्ता निकष कडक

नवीन नियमानुसार:

  • शहरी भागातील वार्षिक उत्पन्न मर्यादा: ३ लाख रुपये

  • ग्रामीण भागातील वार्षिक उत्पन्न मर्यादा: २ लाख रुपये

यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास रेशन कार्डचा लाभ बंद होऊ शकतो.

तसेच खालील निकष लागू होणार:

  • कुटुंबाकडे चारचाकी वाहन असल्यास अपात्रता

  • १०० चौरस मीटरपेक्षा जास्त प्लॉट/फ्लॅट/स्वतःचे घर असल्यास अपात्रता

  • घरातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत असल्यास लाभ बंद

  • घरात एसी किंवा जनरेटर असल्यासही पात्रतेवर परिणाम होऊ शकतो

केवायसी अनिवार्य

रेशन कार्ड सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवायसी न केल्यास रेशन कार्ड आपोआप निष्क्रिय होऊ शकते. चुकीची माहिती देऊन लाभ घेत असल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे लाखो लाभार्थ्यांची पुन्हा छाननी होणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी तातडीने आवश्यक कागदपत्रे अद्ययावत करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *