Ball Of IPL पाहिला का? यॉर्करने फलंदाज कोसळला; जाताना बॉलर …… ………

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ एप्रिल । Ishan Sharma Unplayable Yorker To Andre Russell: इंडियन प्रिमिअर लिगच्या 16 व्या सामन्यामध्ये दिल्लीच्या संघाचा कोलकात्याने 106 धावांनी पराभव केला. कोलकात्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही उत्तम कामगिरी करत हा सामना सहज जिंकला. या सामन्यामध्ये पहिल्या डावात चौकार षटकारांचा पाऊस पडला. त्यातही कोलकात्याकडून खेळाणाऱ्या वेस्ट इंडिजच्या आंद्रे रस्सेलने तुफान फटकेबाजी केली. रस्सेलने 19 बॉलमध्ये 41 धावा केल्या. सामना रंगात आलेला असताना रस्सेल अधिक तुफान फलंदाजी करणार असं वाटतं होतं. मात्र त्याला रोखण्यासाठी कर्णधार ऋषभ पंतने भारताचा अनुभवी क्रिकेटपटू ईशान शर्माच्या हातात चेंडू दिला आणि ईशानने इतका भन्नाट यॉर्कर टाकला की इतर गोलंदाजांना थेट बॉण्ड्रीबाहेर पाठवणाऱ्या रस्सेलच्या पायाजवळू जात बॉलने स्टम्पचा वेध घेतला आणि रस्सेलने पिचवरच साष्टांग लोटांगण घातलं.

फलंदाजानेही टाळ्या वाजवून केलं कौतुक
18 बॉलमध्ये 41 धावांवर खेळणारा रस्सेल शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजी करताना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणार आणि हैदरादाबच्या संघाने काही दिवसांपूर्वीच केलेला सर्वोच्च धावसंख्येचा म्हणजेच 277 धावांचा विक्रम मोडला जाणार असं वाटत होतं. मात्र ईशान शर्माने शेवटच्या ओव्हरचा पहिलाच चेंडू ईशानने इतका अप्रतिम टाकला की त्याचं उत्तर रस्सेलकडे नव्हतं. ईशानचा यॉर्कर थेट मीडल आणि लेग स्टम्पच्या तळाशी जाऊन धडकला. काही कळण्याआधीच रस्सेल जमीनीवर पडला होता. ईशानने रस्सेलचा काटा काढण्यासाठी टाकलेला बॉल इतका सुंदर होता की स्वत:ची विकेट गेल्यानंतरही रस्सेल या चेंडूच्या प्रेमात पडला. रस्सेलने मैदान सोडताना टाळ्या वाजवून इशानचं कौतुक केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *