IPL 2024 – एकहाती सामना फिरवणारा हाच शशांक नको होता प्रीती झिंटाला संघात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ एप्रिल । कधी कधी आपल्याकडून झालेली चूक आपला फायदाही करते, हे पंजाब किंग्जच्या 32 वर्षीय शशांक सिंगने दाखवून दिलीय. तो हाच शशांक आहे ज्याची प्रीती झिंटाने चुकून खरेदी केली होती आणि चूक लक्षात येताच त्याला परत करण्याचीही मागणी केली होती. पण तसं घडलं नाही आणि चुकून का होईना शशांक सिंग पंजाबचा भाग झाला आणि गुरुवारी त्याच शशांकने 29 चेंडूंत 61 धावा ठोकताना गुजरात टायटन्सच्या तोंडातून विजय खेचून आणला.


गुरुवारी अहमदाबादमध्ये पंजाबची 5 बाद 111 अशी भयंकर अवस्था असताना शशांक आणि आशुतोष शर्मा गुजरातवर रॉकेट हल्ला करावा तसे तुटून पडले. संघातील दिग्गज बाद झाल्यावर दोघांनी केलेल्या फलंदाजीमुळे दोघांचेही काwतुक होणे स्वाभाविकच आहे, पण शशांकची संघातील निवड स्वाभाविक नव्हती. प्रीती झिंटाला 19 वर्षीय शशांकला संघात घ्यायचे होते, पण नामसाधर्म्यामुळे हा छत्तीसगडचा 32 वर्षीय शशांकची खरेदी केली गेली. अवघ्या 20 लाखांतच त्याची खरेदी केली. चूक लक्षात येताच प्रीती आणि नेस वाडिया यांनी शशांकला परत करण्याचीही भूमिका घेतली होती. या लिलावावर काही वादही झाले, पण नंतर शशांकला संघात कायम ठेवण्यात आले. याच शशांकने आपल्या बॅटची कमाल दाखवत सर्वांना खूश केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *