Rent : भाडेकरू भाडं देत नाही, घरही रिकामं करत नाही; या गोष्टी लक्षात ठेवा, कधीच अडचण येणार नाही

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ एप्रिल ।। घर किंवा फ्लॅट, दुकान, इत्यादी भाड्याने देणं देशभरात एक सामान्य बाब आहे. परंतु भाडेकरूने घरभाडे न देणे किंवा घर रिकामं न करण्याची अनेक प्रकरणे आपण समोर आली आहेत. अनेक वेळा भाड्यावरून वाद उग्र रूप धारण करतो आणि प्रकरण हाणामारी (मारामारी) पर्यंत पोहोचते. अशा परिस्थितीत, भाडेकरूकडून भाडे वसूल करण्यासाठी किंवा घर रिकामे करून घेण्यासाठी काय कायदेशीर उपाय आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो.

जर एखादी व्यक्ती आपले घर, फ्लॅट किंवा दुकान भाड्याने देत असेल तर सर्वप्रथम भाडेकरार करून घेणे आवश्यक आहे. पण अनेकदा विशेषतः छोट्या शहरांमध्ये लोक घरमालक भाडे करार करत नाहीत. घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील भाडे करार हा भाडेकरूकडून रेंट वसूल करण्यासाठी खूप उपयुक्त साधन असून भाडेकरूने भाडे न दिल्यास भांडण करण्याऐवजी घरमालकाने कायदेशीर पर्यायांचा अवलंब करावा.

भाडे करार करा
घरमालक आणि भाडेकरूमध्ये भाडेकरार होणे आवश्यक आहे. भाडेकरार या दस्तऐवजात भाड्याची रक्कम, देय तारीख आणि न भरण्याचे परिणाम समाविष्ट असतात. तसेच हा दस्तऐवज जमीन मालकाने केलेल्या कोणत्याही कायदेशीर कारवाईचा आधार असतो त्यामळे कायदेशीर दस्तऐवज काळजीपूर्वक करा आणि सर्व अटी स्पष्टपणे नमूद करावे. भाडे कधी दिले जाईल, सिक्युरिटी डिपॉझिट किती असेल आणि भाडे न भरल्यास काय परिणाम होतील, या सर्व गोष्टी भाडे करारात नमूद केल्या पाहिजेत.

भाडेकरूला नोटीस पाठवा
देय तारखेला भाडेकरूने भाडे न भरल्यास घरमालक कायदेशीर नोटीस देखील पाठवू शकतो. नोटीसमध्ये भाड्याची थकबाकी, देयकाची अंतिम मुदत आणि पालन न केल्यामुळे होणाऱ्या परिणामांचा समावेश असावा. भारतीय करार कायदा १८७२ अंतर्गत नमूद केलेल्या सर्व कायदेशीर अटींचे पालन करून नोटीस पाठवली पाहिजे.

कोर्टात खटला दाखल करा
कायदेशीर नोटीस देऊनही भाडेकरूने भाडे भरले नाही, तर घरमालक कोर्टात खटला दाखल करू शकतो. सुरुवातीला खालच्या कोर्टात केस दाखल करावी लागेल आणि तुम्हाला भाडे मिळण्याचा अधिकार असेल व कराराच्या सर्व अटी पूर्ण केल्या असतील, तर न्यायालय तुमच्या बाजूने निकाल देईल.

निष्कासनाची कारवाई
भाडेकरूने जर सातत्याने भाडे देत नसेल तर घरमालक बेदखल कारवाई देखील सुरू करू शकतात. भारतातील बेदखल कायदे राज्यानुसार वेगवेगळे असतात. भाडेकरूला तुमच्या मालमत्तेतून बेदखल करण्यासाठी बेदखल खटला दाखल करण्यापूर्वी चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *