‘तारक मेहता’ ‘सोढी , 5 दिवसांपासून बेपत्ता; CCTV फुटेजमुळे संशय बळावला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ एप्रिल ।। Gurcharan Singh CCTV Footage : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील सोढी ही भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग सोढी बेपत्ता असल्याची बातमी समोर आली आहे. 22 एप्रिल रोजी गुरुचरण सिंग हा त्याच्या दिल्लीत असलेल्या वडिलांच्या घरून निघाला होता. तिथून तो सरळ मुंबईला येणार होता. पण तो मुंबईला आलाच नाही. इतकंच नाही तर त्याचा फोन देखील बंद आहे, त्याच्या वडिलांनी तो बेपत्ता असल्यानं त्या प्रकरणात पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. IPC च्या कलम 365 अंतर्गत एफआयआरही नोंदवण्यात आली आहे. त्यात आता पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज देखील मिळाली आहे. त्यावरुन हे अपहरणचं प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे.

50 वर्षांचा गुरुचरण सिंग 4 दिवसांपूर्वी बेपत्ता झाला आहे. ना तो मुंबईला पोहोचला ना तो वडिलांच्या घरी परत गेला. पोलिसांनी केलेल्या तपासात ही माहिती मिळाली की गुरुचरण 22 एप्रिल रोजी सकाळी दिल्लीहून मुंबईच्या दिशेनं निघाला होता. 8.30 वाजता त्याची दिल्लीवरून मुंबईला येणारी फ्लाइट होती. पण त्यानं फ्लाइट पकडली नाही. त्यानंतर गुरुचरण सिंगशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही, तर त्याच्या वडिलांनी 25 एप्रिल रोजी दिल्लीच्या पालम ठाण्यात त्याची बेपत्ता असल्यानं तक्रार दाखल केली.

‘आजतक’च्या रिपोर्टनुसार, आता या प्रकरणात पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाली आहे, ज्यात गुरुचरण रात्री 9 वाजून 14 मिनिटांनी दिल्लीच्या पालम परिसरातील परशुराम चौकात पायी चालताना दिसला. तर त्याच्या पाठीवर बॅग होती. त्याच्यासोबत पोलिसांनी त्याच्या ट्रांजेक्शनची माहिती देखील काढली. ज्यात एक गोष्ट कळली की अनेक ट्रांजेक्शन झाले आहेत. असं म्हटलं जात आहे की पोलिसांना अनेक विचित्र गोष्टी सापडल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यानंतर पोलिस थेट अपहरणाचा संशय व्यक्त करत आहेत. मात्र, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. काहीही बोलण्यापूर्वी अपडेट्सची वाट पहावी लागेल.

दरम्यान, गुरुचरण सिंगनं तारक मेहता या मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारली होती. त्यानंतर वडिलांच्या तब्येतीचं कारण देत त्यानं ही मालिका सोडली. तर इतर कलाकारांप्रमाणे त्याला देखील मालिकेच्या निर्मात्यांनी मानधन दिले नव्हते. जेनिफर मिस्त्रीनं त्या प्रकरणी तक्रार केल्यानंतर गुरुचरणला देखील या प्रकरणात त्याचं मानधन मिळालं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *