ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता RTO टेस्टच नाही; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । केंद्र सरकारनं वाहन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासंबंधी नवे नियम ( Driving License New Rules) लागू केले आहेत. त्यामुळे तुम्हाला आरटीओमध्ये (RTO) जाऊन लांबच लांब रांगांत उभं रहायची गरज नाही की ते लायसन्स येईपर्यंत पुन्हा पुन्हा ऑफिसात खेटे घालण्याचीही गरज अजिबात नाही. नव्या नियमांनुसार ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची पद्धत अगदी सोपी झाली आहे त्याविषयीच आज जाणून घेऊया. झी न्यूजने हे वृत्त दिलं आहे.

नव्या नियमांनुसार कोणत्याही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओत जाऊन आता टेस्ट देण्याची गरज नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्रालयाने मंजुरी दिलेले नवे नियम याच महिन्यात लागू झालेले आहेत त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओच्या वेटिंग लिस्टमध्ये नाव असलेल्या देशातील कोट्यवधी लोकांना दिलासा मिळाला आहे.

ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये घायला लागणार प्रशिक्षण

ज्यांची नावं आरटीओच्या ड्रायव्हिंग टेस्टच्या यादीत आहेत त्यांना केंद्रीय मंत्रालयाने सांगितलंय की त्यांनी त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये रजिस्ट्रेशन करावं. त्यांनी तिथंच वाहन चालवण्याचं प्रशिक्षण पण दिलं जाईल आणि तिथंच त्यांची टेस्ट घेतली जाईल. स्कूलने दिलेल्या सर्टिफिकेटच्या आधारावरच त्या व्यक्तीचं ड्रायव्हिंग लायसन्स आरटीओ तयार करेल.

 

नव्या नियमांबद्दल जाणून घ्या

ट्रेनिंग सेंटर्ससाठी मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्त्वं निश्चित केली आहेत. ज्यात ट्रेनिंग सेंटर्सच्या क्षेत्रफळापासून ते ट्रेनरच्या शिक्षणासंबंधी नियमांचा अंतर्भाव आहे.

1. दुचाकी, तीन चाकी आणि हलक्या वाहनांचं ट्रेनिंग देणाऱ्या अधिकृत एजन्सीकडे एक एकर जागा असणं आवश्यक आहे. जड वाहनांचं ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना दोन एकर जमीन असणं गरजेचं आहे.

2. ट्रेनर कमीतकमी 12वीं पास असावा आणि त्याला कमीतकमी पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा, त्याला वाहतुकीच्या नियमांची व्यवस्थित माहिती असायला हवी.

3. मंत्रालयाने एक शिक्षण अभ्यासक्रमही तयार केला आहे. हलकं मोटर वाहन चलवण्याचं ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जास्तीतजास्त 4 आठवड्यांचा वेळ असेल. हा अभ्यासक्रम 29 तासांचा असेल. या अभ्यासक्रमात थेअरी आणि प्रॅक्टिकल असे दोन भाग असतील.

4. लोकांना प्राथमिक रस्ते, ग्रामीण रस्ते, राजमार्ग, शहरातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग, घाटात गाडी चालवणं आणि उतारावर गाडी चालवणं शिकण्यासाठी 21 तास खर्च करावे लागतील. म्हणजे या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी 21 तास प्रत्यक्ष ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण घ्यावं लागेल. अभ्यासक्रमात थेअरीसाठी 8 तास अभ्यास करावा लागेल. यामध्ये रस्त्यावरील नियम समजून घेणं, रस्त्यावरची भांडणं, ट्रॅफिकच्या नियमांचं शिक्षण, अपघातांची कारणं समजून घेणं, प्रथमोपचार आणि ड्रायव्हिंग इंधन दक्षता हे विषयांचा समावेश असेल.अशा प्रकारे तुम्ही हा 29 तासांचा अभ्यास पूर्ण केलात की ड्रायव्हिंग स्कूल तुम्हाला सर्टिफिकेट देईल आणि आरटीओ तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *