Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Money Transfer: भारतातून परदेशात पैसे पाठवणे महागले, खिशाला लागणार कात्री; द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क - Maharashtra 24

Money Transfer: भारतातून परदेशात पैसे पाठवणे महागले, खिशाला लागणार कात्री; द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ मे । तुमची मुले परदेशात आहेत का? तुमच्या ओळखीची व्यक्ती परदेशात फिरायला गेली आहे आणि अचानक पैशांची गरज पडली? तुम्हालापण अशा परिस्थितीचा सामना करावा लागत असेल आता यापुढे परदेशात पैसे पाठवणे किंवा ट्रान्सफर करणे तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), HDFC आणि ॲक्सिस यासह देशभरातील आघाडीच्या बँका आपल्या ग्राहकांना परदेशात पैसे पाठवायची सुविधा उपलब्ध करून देत आहे. तर आता या बँकांनी परदेशात पैसे पाठवण्याचे व्यवहार शुल्क वाढवले आहेत.

भारतातून परदेशात पैसे पाठवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ‘लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम’ म्हणजे LRS या नावाने योजना राबविते ज्याअंतर्गत एक भारतीय शिक्षण आणि वैद्यकीय खर्चासाठी वर्षभरात भारतातून २.५ लाख डॉलर्सपर्यंत रक्कम परदेशात पैसे पाठवू शकतात. आतापर्यंत अनेक बँकांनी परदेशात पैसे पाठवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले नाही, परंतु आता बहुतांश बँकांनी अशा शुल्कात वाढ केली आहे.

बँकांचे व्यवहार शुल्क
आता कोणती बँक किती शुल्क आकारेल ते पाहूया…

एचडीएफसी बँक
भारतातून ५०० डॉलर किंवा समतुल्य रक्कम परदेशात पाठवल्यास तुम्हाला HDFC बँकेतील प्रत्येक व्यवहारावर ५०० रुपये शुल्क आणि इतर टॅक्स भरावा लागेल. त्याचप्रमाणे, ५०० डॉलरपेक्षा जास्त रक्कम असेल, तर १,००० रुपये + कर आकारला जाईल. तसेच परदेशातून पैसे पाठवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

स्टेट बँक ऑफ इंडिया
देशातील सर्वात मोठ्या बँकेत परदेशात पैसे पाठवण्याचे शुल्क वेगवेगळ्या देशांच्या चलनावर अवलंबून आहे. पण हे शुल्क पैसे पाठवणाऱ्याने नाही तर पैसे मिळवणाऱ्याने भरावे लागते. एसबीआयचे हे शुल्क चलन रूपांतरण दराशी जोडलेले आहेत. डॉलरच्या उदाहरणाने आपण समजून घेऊया. समजला एखाद्याला १००० डॉलर्स पाठवायचे आहे आणि एसबीआय १० डॉलर कमिशन घेते. तर परदेशांत मनी ट्रान्सफरची सुविधा देणारी बँक देखील एक डॉलर आकारते तर जी व्यक्ती पैसे घेईल त्याला १,००० डॉलर्सऐवजी फक्त ९८९ डॉलर्स मिळतील.

एसबीआय यूएस डॉलरसाठी १० रुपये, ब्रिटिश पाउंडसाठी ८ रुपये, युरोसाठी १० रुपये, कॅनेडियन डॉलरसाठी १० रुपये आणि सिंगापूर डॉलरसाठी १० रुपये शुल्क आकारते.

ॲक्सिस बँक
ॲक्सिस बँकेद्वारे एका दिवसात परदेशात ५०,००० डॉलर्सपर्यंत पाठवले तर तुम्हाला एक रुपयाही देण्याची गरज नाही. एका दिवसात जास्त रक्कम पाठवायची असल्यास तुम्हाला व्यवहाराच्या रकमेच्या ०.०००४ टक्के कमिशन द्यावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *