जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचं रहस्य माहीत आहे का ? जिभेच्या चवीपेक्षा पोटाकडे लक्ष द्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ नोव्हेबर । चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी (Japanese Secret of long life) सकस आहार, योग्य व्यायाम, तणावविरहित जीवनशैली आदी बाबी महत्त्वाच्या असतात. परंतु, सध्याच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे एकूणच आहार-विहाराचं वेळापत्रक बिघडलं आहे. यामुळे शारीरिक, मानसिक समस्या वाढताना दिसत आहेत. तसंच याचा थेट परिणाम कुठे ना कुठे आयुर्मानावर (Life Span) होत आहे. खरं तर दीर्घायुष्य (Long Life) हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. परंतु, आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारली तरच हे स्वप्न सत्यात येऊ शकतं. जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत जपानमधल्या (Japan) नागरिकांचं आयुर्मान सर्वाधिक असतं. त्या देशातल्या सुमारे 23 लाख नागरिकांनी नव्वदी पार केली आहे. 71 हजारांहून अधिक नागरिकांचं वय 100 पेक्षा अधिक असल्याचं दिसून आलं आहे. एका अहवालातून या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. अर्थात या दीर्घायुष्याला जपानी नागरिकांचा काटेकोर आहार-विहार (Healthy Lifestyle) कारणीभूत आहे. दीर्घायुष्याचा आनंद घेणाऱ्या जपानी नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी नेमक्या कशा आहेत, याविषयीची माहिती `आज तक`ने दिली आहे.

जपानी नागरिकांच्या दैनंदिन आहारात (Daily Diet) सी फूड, सोयाबीन, आंबवलेले पदार्थ, चहा आणि माशांचा प्रामुख्याने समावेश असतो. जपानी नागरिक साखर, बटाटा, दुग्धजन्य पदार्थ आणि फळांच्या सेवनावर फारसा भर देत नाहीत. जपानी आहार जगात सर्वोत्तम मानला जातो. जपानी नागरिकांची त्वचादेखील अत्यंत चांगली असते.

जपानमधल्या बहुतांश हॉटेल्समध्ये प्रमुख डिश म्हणून चपाती किंवा ब्रेडऐवजी भाताला (Rice) प्राधान्य दिलं जातं. तिथले नागरिक चपाती किंवा रोटीऐवजी भात खाणं पसंत करतात. रोटी किंवा ब्रेड रिफाइंड पिठापासून तयार केले जात असल्यानं जपानी नागरिक ते पदार्थ अधिक प्रमाणात खात नाहीत. सोयाबीनमध्ये (Soybean) कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि चांगले फॅट्स मुबलक असतात. त्यामुळे सोयाबीन पचनाला हलका असतो. जपानमध्ये सोयाबीनचा वापर सोया मिल्क, मिसो, टोफू आणि नाटो (आंबवलेलं सोयाबीन) तयार करण्यासाठी होतो. सोया प्रोटीन स्नायूंना बळकटी देतं. त्यामुळे हॉर्मोन्सचं संतुलन चांगलं राहतं. तसंच वजनदेखील वाढत नाही.

भारतीय नागरिकांना जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची जुनी सवय आहे. परंतु, जपानी नागरिक साखर किंवा गोड पदार्थांपासून दूर राहणं पसंत करतात. जपानमध्ये अनेक डेझर्ट (Dessert) लोकप्रिय आहेत. परंतु तरीही तिथले नागरिक तिखट पदार्थ खाण्यास पसंती देतात. जपानी नागरिक प्रामुख्यानं अर्धवट शिजवलेलं अन्न सेवन करतात. तसंच शिजवलेले, आंबवलेले आणि तळलेले पदार्थ खाण्यावरही त्यांचा भर असतो. विशेष म्हणजे जपानी नागरिक अन्न शिजवताना अत्यंत कमी तेल वापरतात.

जपानला चहाप्रिय देश (Tea Lover Country) असंही म्हटलं जातं. जपानी नागरिक प्रमाणापेक्षा अधिक चहाचं सेवन करतात. जपानी नागरिक पारंपारिक माचा चहाला अधिक प्राधान्य देतात. हा चहा पोषक घटकांनीयुक्त असतो. त्यात मुबलक अँटीऑक्सिडंट्स असतात. हा चहा त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम मानला जातो.

त्यांच्या दैनंदिन आहारात नाश्त्याला (Breakfast) महत्त्व अधिक असतं. जपानी नागरिकांचा नाष्ट्यावर अधिक भर असतो. त्यांच्या नाष्ट्यात शिजवलेला भात, डाळी किंवा माशांचा समावेश असतो. अशा प्रकारच्या डाएटमुळे त्यांची भूक शमते आणि अनावश्यक पदार्थ खाण्याची गरज भासत नाही.

पोट 80 टक्के भरेल इतकंच अन्न खावं, असा जपानी नागरिकांचा नियम आहे. या नियमाचं ते काटेकोर पालन करतात. जपानी नागरिक प्रमाणापेक्षा जास्त आणि पोटभर खाणं नेहमीच टाळतात. जपानी नागरिक आवडीच्या पदार्थांवर कधीच तुटून पडत नाहीत. जेवणाच्या वेळी जिभेच्या चवीपेक्षा पोटाकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. जपानी नागरिक लहानशा डिशमध्ये जेवतात. यामुळे जास्त कॅलरीज जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जपानी नागरिक अन्नाचा प्रत्येक घास बारीक चावून खातात. तसंच हळूहळू जेवतात. जेवणादरम्यान मित्र किंवा कुटुंबातल्या सदस्यांशी संवाद साधतात. यामुळे नातं अधिक घट्ट होतं असं ते मानतात. अन्नाचे घास बारीक चावून खाल्ल्यानं ते सहज पचतं.

जपानी नागरिक अशा सर्व गोष्टी अगदी काटेकोरपणे करत असल्यानं त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि ते दीर्घायुषी होतात.

 

आता तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार !

?विचारात पडलात ना ?

दररोजची वाढती महागाई,दररोज मशीनप्रमाणे धावपळीने होणारी दगदग,
न परवडणारी औषधे व विविध तपासण्या,हाॅस्पिटलचा अमाप खर्च व या सर्व गोष्टींमुळे जीवनात वाढता तणाव….!
*तेव्हा या सर्व हॉस्पिटल खर्चाचा बोजा सोपवा *
आणि जगा चिंतामुक्त जीवन
एक आरोग्य विमा योजना… तुमच्या संपूर्ण कटुंबासाठी !
मेडिक्लेम व इन्शुरन्स

  Call ;9226262899

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *