Maharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१८ मे ।। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. विद्यार्थी गेल्या कित्येक दिवसांपासून या निकालाची वाट पाहत आहेत. दहावी-बारावीचा निकाल कधी आणि कोठे पाहता येणार, हा प्रश्न पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडला आहे. राज्यात यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. त्यामुळे आता निकालाची वाट पाहिली जात आहे.

बारावीचा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल. मात्र निकालाची नेमकी तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

दहावीचा निकाल
तसेच दहावीच्या निकालाबाबतही विद्यार्थी आणि पालक यांच्यातही संभ्रम आहे. विद्यार्थी आपल्या निकालाबाबत अतिशय उत्सुक आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. पण हे कधी ते अद्याप कळलेले नाही.

कोणत्या संकेतस्थळावर पाहू शकता निकाल
mahahsscboard.in, mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, hsc.mahresults.org.in या संकेतस्थळावर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. दहावी आणि बारावीचा निकाल 9 विभागांमध्ये लागणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा एकूण नऊ विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

निकाल पाहण्याची पद्धत
स्टेप 1 – ऑफिशिअल संकेतस्थळ म्हणजे mahahsscboard.in, mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, hsc.mahresults.org.in याच्यावर जाऊ शकतात.

स्टेप 2 – होमपेजवर जाऊन ‘Maharashtra SSC Results 2024’ आणि ‘Maharashtra HSC Results 2024’ या लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3 – यानंतर एक विंडो ओपन होईल. त्यानंतर नंबर टाकून Submit मध्ये क्लिक करावं.

स्टेप 4 – महाराष्ट्र दहावी किंवा बारावीचा निकाल स्क्रिनवर दिसेल

स्टेप 5 निकाल पाहून तो डाऊनलोड करुन ठेवा.

निकाल महत्त्वाचा
दहावी आणि बारावीचा निकाल हा मुलांच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा असतो. कारण यावरच विद्यार्थ्यांचं करिअर अवलंबून असतं. पण हा निकालच म्हणजे सर्वस्व नाही. त्यामुळे जर निकाल अपेक्षापेक्षा वेगळा लागला तर खचून न जाता पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *