Petrol-diesel Price Today: अजूनही पेट्रोल शंभरीपारच ! जाणून घ्या इंधनाचे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ नोव्हेबर । गेल्या महिन्यात सातत्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढले होते. नोव्हेंबर महिन्यात मात्र (Petrol-Diesel Rates in November) पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज 17 नोव्हेंबर रोजीचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. आज बुधवारी देखील इंधनाचे दर स्थिर आहेत. यूपीमधील अनेक शहरांसह काही ठिकाणी पेट्रोल 100 रुपये प्रति लीटरपेक्षा कमी दराने मिळते आहे. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे.

केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल साधारण 10 रुपयांनी कमी झालं होतं. दिवाळी दिवशी अनेक शहरात एवढी कपात पाहायला मिळाली होती. अनेक राज्यांमध्ये तर राज्य सरकारांनी देखील किंमती कमी केल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेल 12-12 रुपयांनी कमी झालं आहे.

हे वाचा-सावधान! परदेशातून सोनं आणताना जाणून घ्या सीमा शुल्क विभागाचे नियम; अन्यथा…

17 नोव्हेंबर रोजी इंधनाचे दर (Petrol Diesel Price on 17 November 2021)

@ दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर

@ मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर

@ चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर

@ कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर

@ श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लीटर

 

आता तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार !

?विचारात पडलात ना ?

दररोजची वाढती महागाई,दररोज मशीनप्रमाणे धावपळीने होणारी दगदग,
न परवडणारी औषधे व विविध तपासण्या,हाॅस्पिटलचा अमाप खर्च व या सर्व गोष्टींमुळे जीवनात वाढता तणाव….!
*तेव्हा या सर्व हॉस्पिटल खर्चाचा बोजा सोपवा *
आणि जगा चिंतामुक्त जीवन
एक आरोग्य विमा योजना… तुमच्या संपूर्ण कटुंबासाठी !
मेडिक्लेम व इन्शुरन्स

  Call ;9226262899

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *