IND vs SL : टीम इंडियाला मोठा धक्का, 2 मॅच विनर खेळाडू सीरिजमधून आऊट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ फेब्रुवारी । भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टी20 सीरिज गुरूवारपासून सुरू होणार आहे. वेस्ट इंडिज विरूद्ध 3-0 असा विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया सध्या टी20 प्रकारात नंबर 1 आहे. हा पहिला क्रमांक टिकवण्यासाठी श्रीलंका सीरिज जिंकण्याचा भारतीय टीमचा प्रयत्न असेल. ही सीरिज सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

भारतीय टीममधील सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि दीपक चहर (Deepak Chahar) हे दोन मॅच विनर खेळाडू दुखापतीमुळे सीरिजमधून आऊट झाले आहे. वेस्ट इंडिज विरूद्धच्या टी20 सीरिजमध्ये ‘प्लेयर ऑफ द मॅच’ असलेल्या सूर्यकुमार यादवला लखनऊमध्ये गेल्यावर अनफिट जाहीर करण्यात आले आहे. त्याला हेअर लाईन फॅक्चर आहे. ‘क्रिकबझ’नं हे वृत्त दिलं आहे. सूर्याला ही दुखापत कधी आणि कुठे झाली? हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. पण, वेस्ट इंडिज विरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात फिल्डिंग करताना त्याला ही दुखापत झाल्याचं मानलं जात आहे.

सूर्यकुमार या सीरिजमधून बाहेर पडलेला दुसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी फास्ट बॉलर दीपक चहरही दुखापतीमुळे या सीरिजमधून आऊट झाला. चहरनं रविवारी झालेल्या सामन्यात फक्त 1.5 ओव्हर्स बॉलिंग केली होती. त्यानंतर स्नायू दुखावल्यामुळे त्याने मैदान सोडले होते.

चहर या दुखापतीमुळे लखनऊमध्येही आलेला नाही. त्याची दुखापत बरी होण्यासाठी 5 ते 6 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे महेंद्रसिंह धोनीचेही (MS Dhoni) टेन्शन वाढले आहे. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये चहरला 14 कोटींमध्ये खरेदी केले आहे. आता या दुखापतीमुळे तो आयपीएलमध्ये सुरूवातीच्या सामन्यांमधून आऊट होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *