Side Effects of Excess Water : जास्त पाणी पिणे आरोग्यास धोकादायक, असू शकतो हा गंभीर आजार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ एप्रिल । Side Effects of Excess Water : आपल्या शरीराचा आणि पृथ्वीचा जाद्यातर भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मानवी गरजांमध्ये प्रमुख असलेले पाणी हे आपले आरोग्याचा बॅलन्स बनवून ठेवते. पण, पाणी पिण्याचे काही नियम आहेत. जे आपल्या शरीराला आरोग्यदायी बनवतात.

शरीराला डिहायड्रेशन पासून वाचवण्याचे आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम पाणी करते. त्यामुळे उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु या दरम्यान आपण जास्त पाणी पिणे देखील टाळले पाहिजे.

आरोग्य प्रशिक्षक आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियांका शेरावत यांनी दररोज किती पाणी प्यावे हे सांगितले. जेणेकरून त्यापासून होणारा त्रासाला आपल्याला सामोरे जायला लागणार नाही. तहान कशी लागते आणि जास्त पाणी पिण्याची सवय आऱोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकते हे जाणून घेऊया.

https://www.instagram.com/docpriyankasehrawat/?utm_source=ig_embed&ig_rid=21d51089-0d07-4105-b899-59a35c3e0abb

24 तासात किती पाणी प्यावे?

प्रियांका शेरावत यांनी एका दिवसात किती पाणी लागते याची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, 24 तासात 2 ते 3 लिटर पाणी पिणे आपल्या शरीरासाठी पुरेसे आहे. तेवढेच पाणी प्या, त्या व्यतिरीक्त ज्यादा पाणी पिऊ नका. त्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलची वारी करावी लागेल. त्यामुळे याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच अती पाणी प्या.

डॉ. प्रियांका म्हणाल्या की,आपल्या मेंदूत थ्रस्ट सेंटर असते. जेव्हा जेव्हा शरीरात पाण्याची पातळी कमी होते तेव्हा काही पेप्टाइड्स स्रावित होतात. जे थ्रस्ट सेंटरला सूचित करते की शरीराला पाण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याला तहान लागण्यास सुरवात होते.

तहान न लागता पाणी पिण्याच्या सवयीला सायकोजेनिक पॉलीडिप्सिया म्हणतात. डॉ. प्रियांका यांच्या म्हणण्यानुसार यामध्ये व्यक्ती तहान न लागताही दर 2-5 मिनिटांनी पाणी घेत राहते. हे शरीरासाठी अत्यंत हानिकारक असून शरीरातील द्रवपातळी जास्त होते.

सोडियमची कमी
Kidney.org (रे.) नुसार, शरीरात जास्त पाणी असल्यास सोडियमची पातळी खाली येते. यामुळे पेशींमध्ये जास्त पाणी पोहोचते आणि सूज येते. या अवस्थेला हायपोनाट्रेमिया म्हणतात, जे मेंदूसाठी विशेषतः हानिकारक आहे आणि त्या व्यक्तीस कोमात नेऊ शकते.

हायपोनाट्रेमियाची लक्षणे

मळमळ किंवा उलट्या

डोकेदुखी किंवा थकवा

कमी रक्तदाब

एनर्जी कमी होते

स्नायूंमध्ये कमकुवतपणा किंवा पेटके

चिंता किंवा राग येणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *