मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहतूककोंडी; लगीन सराई अन् सुट्ट्यांमुळे वाहनांच्या लांब रांगा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ एप्रिल । सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडं जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक ठप्प झाली आहे. जवळपास दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. सलग तिसऱ्या दिवशी ही वाहतूक कोंडी होत आहे. खंडाळा घाटात पुण्याकडे जणाऱ्या लेनवर तीन किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. वाढच्या उष्णेमुळे राज्यातील शांळांना आजपासून सुट्टी देण्यात आली आहे. तसंच उन्हाळी सुट्ट्यांमुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ पाहायला मिळत आहे, असं वाहतूक पोलिसांनी सांगितलं. लगीन सराई असल्यानेही वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर एक ते दीड किमीपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने वाहनधारांना त्रास सहन करावा लागत आहे. सकाळपासून या मार्गावर अशीच परिस्थिती आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे. या कोंडीवर नियंत्रण मिळवण्याचं काम वाहतूक पोलीस करत आहेत.
एक्स्प्रेस-वेवर खालापूर टोलनाका ते खंडाळादरम्यान गुरुवारीही अशीच मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले होते. लगीन सराई आणि सलग सुट्ट्या, यामुळे अनेक नागरिक आपल्या नातेवाईकांकडे, फिरण्यासाठी येत असतात. तसेच उन्हाचा चटका लागू नये यासाठी सकाळच्या वेळीच बाहेर पडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.तसंच अनेक वाहने रस्त्यावर बंद पडत असल्यानेही वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवताना मात्र पोलिसांची दमछाक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *