EPF Withdrawal: नोकरदारांनो, PF खात्यातून पैसे काढण्याची करू नका घाई; तर भरावा लागणार TAX

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुन ।। देशभरातील पगारदार लोकांना लवकर लवकर आयकर (इन्कम टॅक्स) रिटर्न भरण्याचा सल्ला दिला जात आहे. नोकरदारांनी पगारावर कराची गणना करणे आणि आयकर रिटर्न दिलेल्या मुदतीत फाईल करणे खूप महत्त्वाचे आहे. वार्षिक कमाईवर कर भरावा लागेलच परनु प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरताना इतर स्रोतांकडून झालेली कमाईही तुम्हाला ITR मध्ये नमूद करणारे आवश्यक असेल तसेच तुमचे इतर उत्पन्नही करपात्र असू शकते. अशा स्थितीत कोणत्या स्त्रोतातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागेल आणि कोणते उत्पन्न कराच्या कक्षेत येते याबाबत माहित असले पाहिजे.


पीएफ खात्यातून पैसे काढण्यावर आयकर
पेन्शन फंडातून पैसे काढण्यासाठी EPFO ने काही कठोर नियम केले आहेत. ईपीएफ नियमांचे पालन करून पीएफ सदस्य खात्यातून पैसे काढू शकतात, परंतु पीएफमधून पैसे काढल्याने कर दायित्व देखील लागू होते, तर काही विशिष्ट परिस्थितीत, २०% इतका करही भरावा लागू शकतो. एखादा कर्मचारी सतत पाच वर्षे पगारातून EPF खात्यात योगदान देत असेल तर ईपीएफ काढण्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही, परंतु पाच वर्षात योगदान थांबवले तर ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यावर कर भरावा लागेल. समजा एखाद्या कर्मचाऱ्याने पाच वर्षापूर्वी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली तर त्यावर टीडीएस कापला जाईल.

याशिवाय जर एखाद्या कर्मचाऱ्याने ईपीएफओकडे पॅन तपशील दिले असतील तर मुदतीपूर्वी पैसे काढण्यावर १० टक्के टीडीएस कापला जाईल अन्यथा कर्मचाऱ्याला २० टक्के टीडीएस भरावा लागेल. त्याचवेळी कर्मचाऱ्याने आयकर फॉर्म 15G/15H दिला असेल तर त्यावर कोणताही TDS कापला जाणार नाही.

पॅन कार्ड तपशील आवश्यक
अशाप्रकारे, तुमचा पॅन तपशील EPFO कडे नसेल तर कर्मचाऱ्याला EPF काढण्यावर अधिक कर भरावा लागेल. म्हणून कर्मचाऱ्यांना पॅन तपशील EPFO पोर्टलवर अपडेट करण्याचा सल्ला दिला जातो. पीएफ खात्यात जमा रकमेचे – कर्मचाऱ्यांचे योगदान, नियोक्त्याचे (कंपनी) योगदान, नियोक्त्याच्या योगदानावरील व्याज आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानावरील व्याज – असे चार भाग केले जातात. अशा स्थितीत, पीएफमध्ये जमा रक्कम पाच वर्षापूर्वी काढल्यास चारही भागांवर आयकर आकारला जातो.

EPF खात्यातून पैसे काढण्यासाठी आवश्यक दस्तऐवज
EPF सदस्यांच्या बँक खात्याची माहिती
ओळखपत्र आणि पत्ता पुरावा
खाते क्रमांक आणि IFSC कोडसह रद्द केलेला चेक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *