SIP Investment: फक्त 2000 रुपयांची SIP आणि व्हा कोट्यवधीचे मालक… कसे ते जाणून घ्या ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुलै ।।  खासगी  नोकरीत रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळत नाही. मग अशा परिस्थितीत तुम्हालाच स्वतःची रिटायरमेंट प्लॅन करावी लागणार आहे. त्यामुळे नोकरी लागल्या दिवसापासून तुम्ही रिटायरमेंट प्लॅन करणे महत्त्वाचे आहे. कारण मग तुम्ही अगदी कमी पैसे गुंतवूनही निवृत्तीसाठी मोठा फंड तयार करु शकता. सध्या अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्हाला चक्रवाढीचा लाभ मिळतो. म्युच्युअल फंडातील एसआयपी ही त्यापैकी एक योजना आहे. बाजारपेठेशी जोडलेली असूनही ही योजना चांगलीच लोकप्रिय आहे. शेअर्समध्ये थेट पैसे गुंतवण्याच्या तुलनेत, जोखीम काहीशी कमी असते. तसेच, एखाद्याला लाँग टर्ममध्ये कॉस्‍ट एवरेजिंगचा लाभ मिळतो. एसआयपीचा सरासरी परतावा 12 टक्के मानला जातो. अशा परिस्थितीत, या योजनेच्या मदतीने, गुंतवणूकदारांची वेल्‍थ क्रिएशन जलद होते.

समजा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला सेवानिवृत्ती फंड तयार करण्यासाठी 35 वर्ष मिळतील कारण तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत गुंतवणूक कराल. याशिवाय, जलद पैसे कमवण्यासाठी, तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे तुम्हाला दरवर्षी गुंतवणुकीच्या रकमेवर 10 टक्के टॉप-अप करावे लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी 2000 रुपये गुंतवायला सुरुवात केली तर तुम्हाला एका वर्षासाठी 2000 रुपये महिना जमा करावे लागतील आणि पुढील वर्षी रक्कम 10% ने वाढवावी लागेल. अशाप्रकारे तुमचा पगार वर्षानुवर्ष वाढत असताना तुम्हाला गुंतवलेल्या रकमेत दरवर्षी 10 टक्के वाढ करावी लागेल.

समजा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी 2000 रुपयांची SIP सुरू केली. सुरू केल्यानंतर, तुम्हाला या खात्यात संपूर्ण वर्षभर महिना फक्त 2,000 रुपये जमा करावे लागतील. पुढील वर्षी 2000 च्या 10 टक्के म्हणजेच 200 रुपये वाढवावे लागतील. अशा प्रकारे, पुढील वर्षी ही एसआयपी 2,200 रुपये असेल. पुढील वर्षी, तुम्हाला 2,200 रुपयांच्या 10 टक्के दराने 220 रुपये वाढवावे लागतील, अशा परिस्थितीत तुमची एसआयपी 2,420 रुपये होईल. अशाप्रकारे, दरवर्षी तुम्हाला सध्याच्या रकमेत 10 टक्के वाढ करावी लागेल आणि 60 वर्ष हे सतत करावे लागेल.

2000 रुपयांपासून सुरू होणाऱ्या SIP मध्ये 10 टक्के वार्षिक टॉप-अप करून 35 वर्ष गुंतवणूक केल्यास, तुमची एकूण गुंतवणूक 65 लाख 4 हजार 585 रुपये होईल. 12 टक्के सरासरी परतावा पाहिल्यास, तुम्हाला फक्त व्याजातून 2 कोटी 90 लाख 29 हजार 294 रुपये मिळतील. गुंतवलेली रक्कम आणि व्याजासह, तुमच्याकडे 35 वर्षांनंतर एकूण 3 कोटी 55 लाख 33 हजार 879 रुपये असतील. जर तुम्हाला या गुंतवणुकीवर 15 टक्के व्याज मिळाले तर नफा जवळपास दुप्पट होईल आणि तुम्हाला एकूण 6 कोटी 70 लाख 24 हजार 212 रुपये होतील.

नोंद – क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *