![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ मार्च २०२६ ।।
मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
दूरच्या प्रवासाचा योग येईल. जास्त धाडस करू नका. व्यावसायिक प्रगतीचे दर उघडेल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. कामात चंचलता आड आणू नका.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
व्यावसायिक बदलाचे वारे मनात वाहू लागतील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. तब्बेतीच्या तक्रारी कमी होतील. जोडीदाराचे कौतुक केले जाईल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
मनातील आकांक्षा विनासायास पूर्ण होतील. तरुण वर्गाने कसलीही घाई करू नये. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. जोडीदाराविषयी मतभेद संभवतात.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्यावी. वरिष्ठांना नाराज करू नका. धार्मिक कार्याचा लाभ घ्यावा. भावंडांची काळजी लागून राहील. कलाकारांना प्रसिद्धी मिळेल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)
तुमचा मनमोकळा स्वभाव इतरांच्या नजरेत भरेल. वरिष्ठांच्या शाबासकीस पात्र व्हावे. प्रेमप्रकरणातील जवळीक त्रासदायक ठरू शकते. कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. जवळचा प्रवास घडेल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
मुलांचा व्रात्यपणा वाढू शकतो. कामात चिकाटी ठेवावी लागेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुन्या कामातून लाभ संभवतो. अति अपेक्षा बाळगू नका.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
हाती सोपवलेले काम वेळेत तडीस न्याल. कामात कसलीही घाई उपयोगाची नाही. डोके ठिकाणावर ठेवून वागावे. कौटुंबिक बाजू ध्यानात घेऊन वागावे. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
जोडीदाराशी अनबन टाळावी. स्वकष्टाने आर्थिक बाजू सुधाराल. आपल्या वागण्याने कोणी दुखवणार नाही याची काळजी घ्यावी. सत्य-असत्याची खातरजमा करावी. फसवणुकीपासून सावध राहावे.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)
बाह्यरुपावर भुलू नका. काटकसरीचा मार्ग अवलंबाल. नवीन आव्हानाला सामोरे जाल. तुमची काम करण्याची शक्ति वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)
सर्वांशी मधुर वाणीने बोलाल. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. तुमच्या संभाषणाची उत्तम छाप पडेल. कामात अधिक उत्साह येईल. तुमची महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)
व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. काही गोष्टींचे धोरण ठरवावे लागेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवावी. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. तुमची मानमान्यता वाढेल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)
नैराश्याला बळी पडू नका. फसवणुकीपासून सावध राहावे. मैत्रीचे नाते जपावे. जमिनीच्या कामास गतीमानता येईल. अति श्रमाचा थकवा जाणवेल.