1 जून रोजी घेतली होती निवृत्ती, 1 जुलै रोजी RCBमध्ये परतला हा खेळाडू म्हणाला – यावेळी ट्रॉफी उचलणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुलै ।। IPL 2024 चा हंगाम संपल्यानंतर दिनेश कार्तिकने निवृत्ती घेतली होती. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी यष्टिरक्षक तसेच फिनिशरची भूमिका बजावली आणि आपल्या स्फोटक फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. निवृत्तीनंतर तो पुन्हा एकदा आरसीबीमध्ये परतला आहे. मात्र, यावेळी तो फलंदाज किंवा यष्टिरक्षक म्हणून खेळणार नाही. RCB फ्रँचायझीने त्याला IPL 2025 साठी एक नवीन काम सोपवले आहे.

दिनेश कार्तिकने 22 मे रोजी आयपीएल 2024 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्यांचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून प्ले-ऑफसाठी पात्र ठरले होते, परंतु राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाल्याने ते ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. 26 मे रोजी अंतिम सामना संपल्यानंतर, त्याने 1 जून रोजी अधिकृतपणे सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर अवघ्या एक महिन्यानंतर तो आरसीबीमध्ये परतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्यांची आयपीएल 2025 साठी त्यांचे फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. फ्रेंचाइजीने आपल्या सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे.

दिनेश कार्तिकने आरसीबीमध्ये परत येताच चाहत्यांना खास संदेश दिला आहे. तो म्हणाला की, खेळत असताना त्याचा संघ ट्रॉफीच्या जवळ आला, पण तो कधीही जिंकू शकला नाही. आता फलंदाजी प्रशिक्षक झाल्यानंतर कार्तिकने वचन दिले की तो जिंकणारच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *