Vidhan Sabha Election 2023 : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आज जाहीर होणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर | पाच राज्यांतील ६७९ विधानसभा जागांसाठीच्या निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज (दि.९) दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये निवडणुका प्रस्तावित आहेत.

https://x.com/ANI/status/1711206966234849591?s=20

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे. काँग्रेससह २० हून अधिक विरोधी पक्ष I.N.D.I.A.च्या बॅनरखाली एकत्र लढत आहेत. मध्य प्रदेशातील २३०, राजस्थानमधील २००, तेलंगणातील ११९, छत्तीसगडमधील ९० आणि मिझोराममधील ४० विधानसभा जागांसाठी निवडणुका जाहीर होणार आहेत. मिझोराम विधानसभेचा कार्यकाळ या वर्षी १७ डिसेंबर रोजी संपत आहे. तिथे मिझो नॅशनल फ्रंटची सत्ता आहे. तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढील वर्षी जानेवारीमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपत आहे. तेलंगणात भारत राष्ट्र समिती (BRS) तर मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकारे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *