Mint : केसांच्या मजबूतीसाठी फायदेशीर आहे पुदिना ! जाणून घ्या कसा वापर करायचा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑक्टोबर । केसांमध्ये समस्या होण्याचे प्रमाण आजकाल वाढले आहे. केस गळण्याची समस्या तर खूप कॉमन झाली आहे. केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाण ही वाढले आहे. पुरूष-महिला आणि किशोरवयीन मुलांचे केस अकाली पांढरे होण्याची समस्या वाढली आहे. हे खूपच चिंताजनक आहे. केसांच्या या समस्यांमागे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात.

या समस्यांवर आयुर्वेदामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. आयुर्वेदामध्ये पुदिन्याचे आपल्या त्वचेला आणि केसांना होणारे अनेक फायदे देखील सांगितले आहेत. पुदिन्याचा वापर आपण रोजच्या आहारामध्ये करतो. मात्र, केसांच्या मजबूतीसाठी पुदिना अतिशय फायदेशीर आहे.

पुदिन्यामध्ये लोह, झिंक आणि व्हिटॅमिन सी चे मुबलक प्रमाण आढळून येते. पुदिन्यामध्ये असलेल्या या पोषकघटकांमुळे केस मजबूत होण्यास मदत होते. आज आपण केसांच्या मजबूतीसाठी फायदेशीर असलेल्या पुदिन्याच्या हेअर पॅक्सबद्दल जाणून घेणार आहोत.

पुदिन्याचे हेअर पॅक्स खालीलप्रमाणे :

पुदिना आणि काकडी
एक काकडी किसून घ्या. त्यामध्ये पुदिन्याची काही पाने मिसळून त्याची छान पेस्ट करा. तुमचा हेअर पॅक तयार आहे. हा पॅक केसांच्या टाळूला लावा. २०-२५ मिनिटे हा पॅक केसांवर तसाच ठेवा. नंतर केस धुवून टाका.

पुदिना आणि मध
मधामुळे केसांना मऊपणा मिळण्यास मदत होते. पुदिन्याच्या पानांची पेस्ट करून घ्या. त्यामध्ये २ चमचे मध मिक्स करून हा पॅक केसांवर लावा. ३० मिनिटांनंतर तुमचे केस धुवून टाका. या पॅकमुळे केसांना छान पोषण मिळेल.

पुदिना आणि कोरफड
कोरफड ही केसांसाठी आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. कोरफडमुळे केसांना छान चमक मिळते आणि केस मऊ होतात. कोरफडीचा गर किंवा कोरफड जेल काढून घ्या.

आता पुदिन्याच्या पानांची बारीक पेस्ट करून घ्या. कोरफड जेल आणि ही पेस्ट एकत्र करून केसांना लावा. २५ मिनिटांनी केस धुवून टाका. यामुळे केस मजबूत होण्यास मदत मिळेल.

पुदिना आणि लिंबू
पुदिन्याच्या पानांची पेस्ट करून घ्या. या पेस्टमध्ये ३-४ चमचे लिंबाचा रस घाला. त्यानंतर हे मिश्रण एकत्र करून ही पेस्ट केसांवर आणि टाळूवर लावा. ३० मिनिटांनंतर केस धुवून टाका. लिंबामुळे केसांमधील कोंड दूर होण्यास मदत मिळेल आणि केसगळतीची समस्या दूर होऊ शकेलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *