महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुलै ।। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिस (Pune Police) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेणार आहे. अपघात प्रकरणातील आरोपी मुलाची सुटका करण्यात आली आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर आरोपी मुलाची बाल सुधारगृहातून सुटका करण्यात आली होती. आता हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधातच पुणे पोलिस सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी पुणे पोलिस सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाची मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर बाल निरिक्षण गृहातून सुटका करण्यात आली होती. मात्र पुणे पोलिसांनी या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागायचे ठरवले आहे. राज्य सरकारने त्यासाठी परवानगी दिली आहे.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाकडून घडलेला गुन्हा गंभीर आहे. त्यामुळे त्याच्यावर सज्ञान म्हणून खटला चालवण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. सुप्रीम कोर्टाने पुणे पोलिसांची मागणी मान्य केल्यास आरोपी अल्पवयीन मुलाची पुन्हा बाल सुधारगृहात रवानगी होण्याची शक्यता आहे.