Gold-Silver Price Today: सोन्याने पुन्हा घेतली झेप; चांदीही महागली, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०४ मार्च २०२६ ।। सराफा बाजारात सोन्याच्या दरांनी अक्षरशः आकाशाला गवसणी घातली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तेजी आजही कायम असल्याचे चित्र आहे. ०४ मार्च २०२६ रोजी, बुधवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ नोंदविण्यात आली. चांदीच्या किमतीतही बदल दिसून आला आहे. वाढत्या दरांमुळे ग्राहकांच्या खिशावर ताण येत असून, लग्नसराईच्या हंगामात खरेदी करायची की थांबायचं, असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला आहे.

Bullion Market या वेबसाइटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,६४,२०० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,५०,५१७ रुपये नोंदविण्यात आला आहे. चांदीच्या दरातही वाढ झाली असून १ किलो चांदीचा दर २,७२,५५० रुपये इतका आहे. तसेच १० ग्रॅम चांदीसाठी २,८०३ रुपये मोजावे लागत आहेत. उत्पादन शुल्क, राज्य कर, जीएसटी तसेच मेकिंग चार्जेस यांमुळे दागिन्यांच्या अंतिम किमतीत शहरानुसार फरक पडू शकतो.

तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव

मुंबई

२२ कॅरेट (१० ग्रॅम): १,५०,२४२ रुपये

२४ कॅरेट (१० ग्रॅम): १,६३,९०० रुपये

पुणे

२२ कॅरेट (१० ग्रॅम): १,५०,२४२ रुपये

२४ कॅरेट (१० ग्रॅम): १,६३,९०० रुपये

नागपूर

२२ कॅरेट (१० ग्रॅम): १,५०,२४२ रुपये

२४ कॅरेट (१० ग्रॅम): १,६३,९०० रुपये

नाशिक

२२ कॅरेट (१० ग्रॅम): १,५०,२४२ रुपये

२४ कॅरेट (१० ग्रॅम): १,६३,९०० रुपये

(वरील दर सूचक असून त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी आपल्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *