Nawazuddin Siddiqui: ‘ठाकरे’ नंतर नवाजुद्दीनचा आणखी एक बायोपीक, साकारणार या अधिकाऱ्याची भुमिका

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑक्टोबर । Nawazuddin Siddiqui New Biopic News: नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवुडमधील लोकप्रिय अभिनेता. नवाजने आजवर अनेक सिनेमा, वेबसिरीजमधून भुमिका साकारुन लोकांच्या मनावर राज्य केलंय.नवाजने काही वर्षांपुर्वी बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर आधारीत ‘ठाकरे’ सिनेमात काम केलंय. आता पुन्हा एकदा नवाज एका बायोपीकमध्ये झळकणार आहे. काय आहे हा बायोपीक? जाणुन घ्या.


नवाझुद्दीन सिद्दीकी साकारणार या अधिकाऱ्याची भुमिका
ठाकरे सिनेमानंतर नवाजुद्दीन आणखी एक बायोपीकमध्ये भुमिका साकारणार आहे. हा बायोपीक दिवंगत रिअल लाइफ कस्टम ऑफिसर कोस्टा फर्नांडिस यांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीनला साइन करण्यात आले आहे.

सेजल शाह या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. कोस्टा फर्नांडिस यांनी 1990 च्या दशकात गोव्यात सोन्याच्या तस्करीच्या विरोधात लढा दिला होता.

लवकरच सिनेमाच्या शुटींगला सुरुवात
अमर उजालाने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, नवाजुद्दीन कोस्टा फर्नांडिस यांच्या बायोपिकमध्ये स्मगलर्सविरुद्ध लढताना दिसणार आहे. ‘सिरीयस मॅन’ची निर्मिती करणाऱ्या सेजल शाहने हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.आता लवकरच गोव्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. या सिनेमात कोस्टा फर्नांडिसच्या आयुष्यात घडलेल्या रोमांचक आणि नाट्यमय घटना दाखवल्या जाणार आहेत

कोण होते कोस्टा फर्नांडीज ?
कस्टम अधिकारी कोस्टा फर्नांडिज यांचे वर्णन एक ‘दुर्मिळ नायक’ म्हणून केले जाते. कोस्टा फर्नांडीज यांनी अनेक जीवावर बेतलेल्या अनेक घटनांचा सामना केलाय. याशिवाय गुन्हेगार आणि तस्करांसोबत झालेल्या चकमकींमुळे त्यांना लक्षात ठेवले जाते.

त्यांनी जीव धोक्यात घालून तस्करीचे अनेक प्रयत्न थांबवले. कोस्टा फर्नांडिस हे गोवा कस्टम्समध्ये 1979 मध्ये प्रतिबंधात्मक अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यांच्या आयुष्यावर आधारीत येणारा हा सिनेमा नक्कीच रंजक असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *