Tata Electric Cars : टाटा आणणार तीन नवीन हाय रेंज इलेक्ट्रिक कार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑक्टोबर । इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचा बराच दबदबा आहे. आता कंपनी इलेक्ट्रिक अवतारमध्ये आपले लोकप्रिय मॉडेल लाँच करणार आहे. टाटाच्या तीन नवीन इलेक्ट्रिक कार लवकरच मार्केटमध्ये येणार आहेत.

Nexon EV चे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केल्यानंतर आता Tata Harrier EV, Tata Punch EV आणि Tata Curvv EV लवकरच ग्राहकांसाठी मार्केटमध्ये आणल्या जाऊ शकतात. टाटा लवकरच ग्राहकांसाठी नवीन मॉडेल्स लाँच करणार आहे, जे फुल चार्जवर अधिक रेंज ऑफर करतील, असे कंपनीचे म्हणणे आहे. दरम्यान, तीन आगामी इलेक्ट्रिक मॉडेल्सबद्दल माहिती जाणून घ्या…


Tata Punch EV
टाटा मोटर्सच्या या लोकप्रिय एसयूव्हीचे सीएनजी आणि पेट्रोल व्हर्जन लाँच करण्यात आले असून आता लवकरच कंपनी या कारचा इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करणार आहे. टेस्टिंग दरम्यान ही कार अनेक वेळा दिसून आली आहे, ही कार दोन वेगवेगळ्या क्षमतेच्या बॅटरीसह लाँच केली जाऊ शकते आणि या कारची ड्रायव्हिंग रेंज 300 ते 350 किलोमीटरपर्यंत असू शकते. सध्या कंपनीने या कारच्या लाँचिंग तारखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Tata Harrier EV
काही दिवसांपूर्वी टाटाने हॅरियरचे फेसलिफ्ट मॉडेल ग्राहकांसाठी लाँच केले आहे. आता कंपनी लवकरच ग्राहकांसाठी या एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करू शकते. या एसयूव्हीमध्ये 60kWh ची बॅटरी दिली जाऊ शकते आणि या कारमध्ये वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड देखील उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे.

Tata Curvv EV
टाटाने यावर्षी ऑटो एक्सपोमध्ये या कारचे पेट्रोल व्हेरिएंट दाखवले होते आणि आता या कारचे इलेक्ट्रिक मॉडेल लाँच करण्याची अपेक्षा आहे. या कारमध्ये उच्च क्षमतेची बॅटरी दिली जाईल, जी ग्राहकांना एका पूर्ण चार्जमध्ये 500 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *