अजितदादा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसेनात, उलटसुलट चर्चा; हे आहे कारण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑक्टोबर । भाजप महाराष्ट्रनं सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईनचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे १६ आमदार अपात्र ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली. शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाईल आणि फडणवीस राज्याचे नेतृत्त्व करतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. पण भाजप महाराष्ट्रानं तो व्हिडीओ काही वेळातच डिलीट केला. पण त्या व्हिडीओमुळे शिंदे आणि अजित पवार गटाची धाकधूक वाढली.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार फारसे कोणत्या कार्यक्रमात दिसलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू आहे. आता यावरुन राष्टवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. अजित पवारांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती पटेल यांनी दिली. अजित पवारांच्या प्रकृतीत पूर्ण सुधारणा झाल्यावर ते पूर्ण क्षमतेनं काम सुरू करतील, असं पटेल यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

https://x.com/praful_patel/status/1718486969666470208?s=20

‘अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत, अशा चर्चा सुरू आहेत. त्याबद्दलच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. त्यांना काल डेंग्यूची लागण झाल्याचं निदान झालं आहे. काही दिवस आराम करण्याच्या सूचना त्यांना डॉक्टरांनी दिल्या आहेत. जनतेची कामं करण्यासाठी अजित पवार कटिबद्ध आहेत. प्रकृती सुधारल्यानंतर ते जनतेची कामं पूर्ण ताकदीनं सुरू करतील,’ अशी माहिती पटेल यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *