Dada Bhuse: शेतकऱ्यांना बसणार आश्चर्याचा धक्का ! मुख्यमंत्री ‘या’ दिवशी करणार मदत जाहीर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ डिसेंबर।। Dada Bhuse in Winter Session: शेतकऱ्यांच्या अडचणीची सरकारला पूर्ण जाणीव आहे. थोडा धीर धरा. मुख्यमंत्री शुक्रवारी मोठी मदत जाहीर करणार आहे. ती ऐकून तुम्हालाही आश्यर्याचा धक्का बसेल असा दावा सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादा घुसे यांनी केला.

विधानसभेत शेतकरी, गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळावरील अल्पकालीन चर्चेला त्यांनी उत्तर दिले. विरोधकांतर्फे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी रेटून धरली जात आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टिवार यांनी सभागृहात दोनदा स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला.

मात्र तो फेटाळून लावण्यात आला. सोमवारी या विषयावर अल्पकालीन चर्चा घेण्यात आली. यास दादा भुसे यांनी मंगळवारी उत्तर दिले. ते म्हणाले, आमचे सरकार शेतकऱ्यांना मदत देणारच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बांधावर जाऊन आले आहेत. तातडीने पंचनामे केले जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे शुक्रवारी याबाबत घोषणा करणार आहेत. ती ऐकून तुम्हला आश्चर्य वाटेल. तुम्ही तोंडात बोटे घालाल, असे दादा भुसे यांनी सांगितले.

फक्त घोषणा नको मदत द्या
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तुम्ही पावसाळी अधिवेशनात जाहीर केलेली मदत अद्याप मिळाली नसल्याचे सांगून बोटात तोंडे घालून शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही, असे सुनावले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *