केपटाऊन पिच ; भारतात आल्यावरही तोंड बंद ठेवा… केपटाऊन पिचवर बोलताना रोहित शर्मा भडकला, ICC आणि मॅच रेफरीला सुनावलं

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जानेवारी ।। भारताने दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका न जिंकल्याचं दुःख रोहित शर्माच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. पण गुरुवारी दुसऱ्या कसोटीत सात विकेट्सने मिळवलेल्या विजयाचा अभिमान आहे, असे कर्णधाराने सांगितले. सेंच्युरियनमधील मालिकेतील पहिल्या सामन्यात एक डाव आणि ३२ धावांनी पराभूत झाल्यानंतर भारताने शानदार पुनरागमन केले आणि दुसरी कसोटी जिंकून दोन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. सामना दोन दिवसांत संपला. त्यामुळे आता केपटाऊनच्या खेळपट्टीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा रोहित शर्माला सामन्यानंतर या आफ्रिकन खेळपट्टीबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यानेही चोख उत्तर दिले.

केपटाऊनच्या खेळपट्टीवर रोहित शर्माचे चोख उत्तर
तो म्हणाला, ‘म्हणजे, या सामन्यात काय झाले, खेळपट्टी कशी होती, हे आम्ही पाहिले. मला प्रामाणिकपणे अशा खेळपट्ट्यांवर खेळायला काहीच हरकत नाही, पण तुम्ही भारतात आल्यावर तिथल्या खेळपट्ट्यांवर काहीही न बोलता आणि तक्रार न करता तोंड बंद ठेवता. तोपर्यंत माझी काही हरकत नाही.

रेफरी आणि आयसीसीला धरलं धारेवर
केपटाऊनची खेळपट्टी पाहून कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापला. त्याने सामना संपल्यानंतर आयसीसी आणि मॅच रेफरी यांनाही सोडले नाही. तो म्हणाला, ‘मला वाटते की आपण जिथेही जातो तिथे तटस्थ राहणे महत्त्वाचे आहे. विशेषतः सामनाधिकारी. तुम्हाला माहिती आहे की, काही मॅच रेफरी खेळपट्ट्यांना कसे रेट करतात यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, हे खूप महत्वाचे आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही की विश्वचषक अंतिम खेळपट्टी सरासरीपेक्षा कमी आहे. एका फलंदाजाने फायनलमध्ये शतकही केले होते. ही खराब खेळपट्टी कशी असू शकते? त्यामुळे या गोष्टी आहेत ज्या ICC, सामनाधिकारी यांनी बघितल्या पाहिजेत आणि देशांच्या आधारावर नाही तर याच्या आधारावर रेटिंग द्यायला हवे.

“म्हणून मला आशा आहे की ते त्यांचे कान उघडे ठेवतील, त्यांचे डोळे उघडे ठेवतील आणि खेळाच्या त्या पैलूंकडे पहातील,” हिटमॅन म्हणाला. प्रामाणिकपणे, आम्हाला अशा खेळपट्ट्यांवर खेळण्याचे आव्हान द्यायचे आहे. अशा खेळपट्ट्यांवर खेळण्याचा आम्हाला अभिमान आहे. पण मला एवढेच म्हणायचे आहे की तटस्थ रहा.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *