T20 World Cup 2024: या ठिकाणी रंगणार IND vs PAK सामन्याचा थरार! तारीख आताच नोट करुन ठेवा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जानेवारी ।। टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. येत्या जूनमध्ये वेस्टइंडीज आणि अमेरिकेत या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने वेळापत्रकाची घोषणा केली आहे. भारतीय संघ ५ जून रोजी आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

त्यानंतर ९ जून रोजी भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेला १ जूनपासून प्रारंभ होणार असून भारतीय संघ साखळी फेरीत ४ सामने खेळणार आहे.

https://www.instagram.com/saamtvnews/?utm_source=ig_embed&ig_rid=a473e5f2-1b59-41bd-97bf-13d6864c1811

केव्हा होणार सुरुवात?

आगामी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद वेस्टइंडीज आणि अमेरिकेकडे आहे. या स्पर्धेची सुरुवात कॅनडा आणि अमेरिका यांच्यातील सामन्याने होणार आहे. १ ते १८ जूनदरम्यान साखळी फेरीतील सामन्यांचा थरार रंगणार आहे. तर १९ ते २४ जून दरम्यान सुपर -८, २६ आणि २७ जून रोजी सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. तर २९ जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. (Latest sports updates)

असं असेल स्वरूप..

या स्पर्धेसाठी २० संघ पात्र ठरले आहेत. या चारही संघांना ए पासून डी अशा ४ गटात विभागलं गेलं आहे. या ४ गटांमध्ये प्रत्येकी ५-५ संघ असणार आहेत. भारतीय संघ ए गटात असून भारतीय संघासह पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिकेचा ए गटात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाचे साखळी फेरीतील ३ सामने न्यूयॉर्कमध्ये खेळला जाणार आहे. तर एक सामना फ्लोररिडामध्ये खेळला जाणार आहे.

या स्पर्धेसाठी असं आहे भारतीय संघाचं वेळापत्रक

भारत विरुद्ध आयर्लंड – ५ जून

भारत विरुद्ध पाकिस्तान – ९ जून

भारत विरुद्ध अमेरिका – १२ जून

भारत विरुद्ध कॅनडा – १५ जून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *