महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ सप्टेंबर ।। भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघामध्ये येत्या १९ सप्टेंबरपासून २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईत रंगणार आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज चमकणार यात काहीच शंका नाही. खेळपट्टी पाहता रोहित शर्मा ३ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. दरम्यान जाणून घ्या कशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात यशस्वी जयस्वालसोबत मिळून डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. हे दोघेही आक्रमक फलंदाज आहेत. इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत या जोडीने डावाची सुरुवात केली होती आणि संघाला आक्रमक सुरुवात करून दिली होती. यावेळीही या दोघांकडून चांगली सुरुवात करून देण्याची अपेक्षा असणार आहे.
मध्यक्रमात विराट
या सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंतचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. तो या सामन्यात यष्टीरक्षण करताना दिसेल. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या ध्रुव जुरेलला बसावं लागेल.
सरफराज खानने इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली होती. मात्र त्याला या सामन्यसाठी संधी मिळणं कठीण आहे. कारण केएल राहुलला सहाव्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.
या सामन्यात रविंद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत असेल. तर कुलदीप यादव आणि आर अश्विन या फिरकी गोलंदाजांना देखील संधी दिली जाऊ शकते. तर वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजचा समावेश केला जाऊ शकतो.
पहिल्या कसोटीसाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टिरक्षक), केएल राहुल, रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद