तुमचे लोक पळून गेले होते ; तुम्ही नागपूर स्टेशनवरून पुढे पोहचला का? ; संजय राऊत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ जानेवारी ।। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरहून अयोध्येला जाताना रेल्वे स्टेशनवरील एक छायाचित्र ‘एक्स’ अकाउंटवर ट्वीट केलं आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस कारसेवकांसह दिसत आहेत. यावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्र डागलं आहे. तुम्ही नागपूर स्टेशनवरून पुढे पोहचला का? असा सवाल राऊतांनी फडणवीसांना विचारला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेच्या सहभागाविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. हा अत्यंत हास्यास्पद आणि पोरखट प्रश्न आहे. अयोध्येतील लढ्यात शिवसेनेच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारणे कोत्या आणि संकोचित मनोवृत्तीचं लक्षण आहे. अयोध्येतील कारसेवकांचा नाशिकमध्ये सत्कार आणि सन्मान करणार आहोत.”

“बाळासाहेब ठाकरेंनी बाबरीची जबाबदारी घेतली”
“शिवसेनेच्या सहभागाविषयी ‘डेमोक्रोसी क्लब’ला प्रदर्शन भरवलं आहे. पोलीस स्टेशन, आमच्यावर झालेल्या कारवाया आणि न्यायालयात हजर राहिलेले पुरावे आमच्याकडे आहेत. तुम्हाला पुरावा देण्याची गरज नाही. तुम्ही कोण आहात? तुमचे लोक पळून गेले होते. शेवटी बाळासाहेब ठाकरेंनी बाबरीची जबाबदारी घेतली. तुम्ही नागपूर स्टेशनवरून पुढे पोहचला का? आपण सगळे नागपूर स्टेशनला फिरण्यासाठी गेला असाल. पण, आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरीच्या घुमटावरील फोटो आहेत,” असंही राऊतांनी म्हटलं.

“शिवसेनेचं योगदान समजण्याएवढं देवेंद्र फडणवीसांचं वय नव्हतं”
“लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती यांचं राम मंदिरासाठी योगदान आहे. शिवसेनेचे सर्व खासदार, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख अयोध्येत उपस्थित होते. देवेंद्र फडणवीसांना ‘डेमोक्रोसी क्लब’ला प्रदर्शनासाठी यावं. फक्त इथे ऑपरेशन कमळ होत नाही, ऑपरेशन बाबरीपण होते. अयोध्येतील शिवसेनेचं योगदान समजण्याएवढं देवेंद्र फडणवीसांचं वय नव्हतं,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *