महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ सप्टेंबर ।। परतीच्या पावसानं पुण्यात अक्षरशः दाणादाण उडाली आहे. शहरातील मुख्य भाग असलेल्या पेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं वाहनचालकांना कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. तर पुणे शिवाजीनगर, पुणे विद्यापीठ चौक, बाणेर रोड या परिसरात सकाळपासूनच वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे.