Tata Group Succession: टाटा समूहात नाटकीय घडामोड; नोएल टाटा घेताहेत कायदेशीर सल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑक्टोबर ।। टाटा, या देशातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह व्यावसायिक समूहाच्या प्रमुखपदी गेल्या आठवड्यात नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आली. गेली तीन दशके दिवंगत रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा नवीन आराखडा लिहिलेल्या टाटा समूहाची कमान आता त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्या हाती सोपवण्यात आली असून या दरम्यान, आता नोएल टाटा आपल्या पदाबाबत कायद्याची मदत घेत असल्याचे वृत्त समोर येत आहे. पण नोएल टाटा यांना पदभार स्वीकारल्यानंतर आठवडाभरात कायदेशीर सल्ला घेण्याची गरज काय आहे?

नोएल टाटा टाटा सन्सच्या बोर्डात?
रतन टाटा यांच्या पश्च्यात त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना टाटा ट्रस्टचे अध्यक्ष करण्यात आले तर, आमचे सहयोगी टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नोएल आता टाटा सन्सच्या बोर्डातही सामील होण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे वृत्त आहे. टाटा सन्सची टाटा ट्रस्टमध्ये सुमारे ६६% भागीदारी आहे, जी टाटा समूहातील सर्व कंपन्यांची होल्डिंग कंपनी आहे. टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट या दोन्हींचे प्रतिनिधित्व करणारे नोएल, टाटा कुटुंबातील एकमेव सदस्य, आहेत. याशिवाय टाटा सन्सच्या संचालक मंडळात सामील होण्यासाठी ट्रस्टच्या तीन नामांकित व्यक्तींपैकी नोएल टाटांचे नाव सुचवण्यात आले असून नोएल यांच्याशिवाय वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंह यांचीही नावे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

नोएल टाटा उचलताहेत कायदेशीर पावले
टाटा ट्रस्ट, टाटा समूहाचा एक परोपकारी भाग असून आता या ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आली असून नवनियुक्त अध्यक्ष अजूनही टाटा समूहाच्या इतर कंपन्यांचे अध्यक्षपदी राहू शकतात का, याबाबत कायदेशीर सल्ला घेत आहेत. ९ ऑक्टोबर रोजी रतन टाटांच्या निधनानंतर नोएल यांची ११ ऑक्टोबर रोजी टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.

आता पुढे काय होणार?
कायदेतज्ज्ञांच्या मते, नोएल टाटा समूहाच्या इतर कंपन्यांमध्ये अध्यक्षपदी कायम राहण्यात कोणताही कायदेशीर अडथळा नाही, ज्यामध्ये त्यांची भूमिका गैर-कार्यकारी म्हणून आहे असे अहवालात पुढे म्हटले आहे. मात्र नोएल टाटांना या प्रकरणात घाईघाईने निर्णय घ्यायचा नसून टाटा समूहाच्या भल्यासाठी काय करणे योग्य आहे याची त्यांना खात्री हवी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *