महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑक्टोबर ।। राज्यातील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा ठरवण्यात आल्या आहेत. बारावीच्या बोर्ड परीक्षा या 11 फेब्रुवारी पासून होणार असून दहावीच्या परीक्षा या 21 फेब्रुवारीपासून सुरू होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचं अंतिम वेळापत्रक येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जाहीर करेल असं देखील सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या अवघ्या 3 महिन्यांवर आलेल्या आहेत.
राज्यातील दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षांचं वेळापत्रक येत्या पंधरा दिवसात जाहीर होणार असून फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात 11 फेब्रुवारीला बारावी तर 21 फेब्रुवारीला दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर होईल असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे विधानसभा संपताच काही दिवसांतच दहावी – बारावीच्या बोर्ड परीक्षांचं देखील बीगुल वाजणार आहे.