राष्ट्रीय संरक्षण कामगार संघ ( इंटक) सीओडी देहूरोडचा आमदार महेश लांडगे यांना पाठींबा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ऑक्टोबर ।। राष्ट्रीय संरक्षण कामगार संघ (इंटक ) सीओडी देहूरोड या संघटनेने भोसरी मतदारसंघातील भाजप, शिवसेना आरपीआय, आठवले महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रीय संरक्षण कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी बाळासाहेब गुंड यांनी एका पत्राद्वारे हा पाठिंबा व्यक्त केला आहे.

दरम्यान कामगार वर्गामध्ये आमदार महेश लांडगे यांची क्रेझ असून, या निवडणुकीत कामगार निर्णायक मतदार ठरणार आहेत. या संदर्भात बाळासाहेब गुंड यांनी महेशदादा लांडगे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण भोसरी विधान सभा मतदार संघामध्ये महायुती (भाजपा) च्या वतीने सन २०२४-२०२९ साठी पुन्हा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे आहात हे ऐकून आम्हांस खूप आनंद झाला आहे. आपणास पुन्हा उमेदवार म्हणून पाहणे म्हणजे हे आपल्या कार्याचे फळ आहे. त्यामुळे पुन्हा आम्हास आपल्या बरोबर निवडणुकीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे यापूर्वी ही आपले काम केले आहे आणि यापुढेही करत राहणार आहोत.

महेश लांडगे यांच्या विजयासाठी शुभेच्छा..!

आम्ही संरक्षण विभागामध्ये काम करणारे कामगार आणि आपल्या भोसरी विधानसभा क्षेत्रामध्ये राहणारे आणि आपल्यावर प्रेम करणारे असंख्य कामगार आहोत. आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने आणि आमच्या मित्र परिवाराच्या वतीने आपणांस संपूर्ण पाठिंबा देत आहोत. असे या पत्रात म्हटले आहे तसेच आमदार महेशदादा लांडगे यांना विजयासाठी मनापासून खूप शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *