ऑस्करच्या मंचावर रेसलर जॉन सीना पोहोचला नग्नावस्थेत; व्हिडिओ व्हायरल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ मार्च ।। Oscar 2024 : ऑस्कर २०२४ हा मनोरंजनविश्वातील प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. दरवर्षी जगभरातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना हा पुरस्कार दिला जातो. ९६व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला कलाविश्वातील दिग्गज आणि सेलिब्रिटी उपस्थित होते. या सोहळ्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे.

WWE सुपरस्टार आणि अभिनेता जॉन सीना ऑस्करच्या मंचावर येताच प्रेक्षकांचे डोळे विस्फारले. सर्वोत्कृष्ट कॉच्युम डिझाइनची घोषणा करण्यासाठी ऑस्करच्या मंचावर जॉन सीना नग्नावस्थेत आला होता. ऑस्कर सोहळ्यातील त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याला नग्नावस्थेत पाहून सगळेच अचंबित झाले. ऑस्करच्या मंचावर येताच जॉन सिनाने सर्वोत्कृष्ट कॉच्युम डिझाइनची घोषणा केली. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात या पुरस्कारावर पुअर थिंग्स सिनेमाने नाव कोरलं.

ऑस्करच्या मंचावर जॉन सीनाला नग्नावस्थेत पाहून उपस्थितांना १९७४मध्ये घडलेला प्रसंग आठवला. १९७४मध्ये पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यातही अभिनेता एक नग्नावस्थेत आला होता. दरम्यान, यंदाच्या ऑस्कर २०२४ मध्ये २३ श्रेणींसाठी नामांकन जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये भारताच्या ‘टू किल अ टायगर’ या डॉक्युमेंट्री फिल्मला नामांकन मिळालं आहे. दिग्दर्शिका निशा पहुजा यांनी ही डॉक्युमेंट्री फिल्म दिग्दर्शित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *