हा स्टार खेळाडू खेळणार नाही T20 विश्वचषक ; जय शाह यांनी केली मोठी घोषणा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ मार्च ।। या वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. टीम इंडिया हा विश्वचषक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. 2007 मध्ये भारताने पहिल्यांदा T20 विश्वचषक जिंकला होता. मात्र त्यानंतर हा संघ पुन्हा T20 मध्ये विश्वविजेता बनू शकलेला नाही. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला हा दुष्काळ संपवायचा आहे. पण त्याआधी भारताचा एक मोठा खेळाडू यंदाच्या टी-20 विश्वचषकात खेळणार नसल्याचे निश्चित झाले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत खुलासा केला आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आहे.


शमीला वनडे वर्ल्डकपमध्ये दुखापत झाली होती. त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. एकदिवसीय विश्वचषकापासून शमी भारताकडून खेळलेला नाही. या विश्वचषकात त्याने सात सामन्यांत 24 बळी घेतले आणि स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. पण आता त्याच्या T20 विश्वचषक खेळण्यावर शंका निर्माण झाली आहे. शमीच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली असून सध्या तो त्यातून सावरत आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शमीच्या पुनरागमनाची माहिती दिली. जय शाह म्हणाले की, शमीच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली असून तो भारतातही परतला आहे. जय शाह यांनी सांगितले की, भारताला बांगलादेशविरुद्ध मायदेशात खेळायच्या असलेल्या कसोटी मालिकेत शमी पुनरागमन करू शकतो. याचा स्पष्ट अर्थ असा की शमी 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळणार नाही आणि 2 जूनपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतही तो खेळू शकणार नाही. T20 विश्वचषक आजपासून म्हणजेच 12 मार्चपासून 82 व्या दिवशी सुरू होणार आहे आणि त्याआधीही शमीबाबत भारतासाठी ही चांगली बातमी नाही.

एकदिवसीय विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये शमीला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले नव्हते. पण हार्दिक पांड्याला दुखापत झाली, शमीला संधी मिळाली आणि या गोलंदाजाने चमत्कार करून उर्वरित संघांना अडचणीत आणले. शमी ज्या प्रकारचा गोलंदाज आहे, ते पाहता तो खेळला नाही, तर टीम इंडियाचे मोठे नुकसान होईल. टीम इंडियाला शमीची उणीव भासेल हे स्पष्ट आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *