महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तन हवं आहे ; शरद पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.७ नोव्हेंबर ।। महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. २० तारखेला राज्यात एका टप्प्यात मतदान पार पडणार आहे आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट सामना या निवडणुकीत पाहण्यास मिळणार आहे. महाराष्ट्रात आता प्रचार सुरु झाला आहे. महाविकास आघाडीची पहिली सभा मुंबईतल्या बीकेसी मैदानावर पार पडली. या सभेत निवडून आल्यानंतर पाच मोठी आश्वासनं काय असतील ते राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलं. शरद पवार नागपूरमध्ये आज तीन सभा घेणार आहेत. या अनुषंगाने त्यांनी नागपूरमध्ये आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्राला परिवर्तन हवं आहे असं शरद पवार म्हणाले.

महाविकास आघाडीच्या पाच प्रमुख घोषणा काय?

१) महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास लागू करणार

२) शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देणार

३) जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार.

४) २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे दिली जाणार.

५) बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत दिली जाणार.

महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तन हवं आहे
महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आमचा प्रचार सुरु झाला आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आम्ही सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मीदेखील त्या सभेला उपस्थित होतो. प्रचाराची सुरुवात आम्ही केली आहे. मी आता नागपूरला आहे. नागपूरमध्ये तीन सभा घेतल्या जाणार आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तन हवं आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे. आजपासून राज्यांमध्ये दौऱ्यांवर निघाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *