महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ नोव्हेंबर ।। गेल्या दहा वर्षांत काय केले? असे विरोधक वारंवार विचारतात त्यांना आरोप करू द्या आपण आपले काम त्यांना दाखवू असे सांगताना दिघी रस्त्यावरील गाठीभेटी दरम्यान भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी दिघी रस्त्यावरील वाहनतळाची उभारणी आगामी काळात दिघी व आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी हटवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले.
महायुतीचे भाजपचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दिघी रस्ता परिसरात भेटीगाठीचे आयोजन केले होते. गवळीनगर येथील नागरिकांच्या गाठीभेटी घेत हरिओम स्वीट चौकातील रस्त्यावरील व्यापाऱ्यांच्या महेश लांडगे यांनी गाठीभेटी घेतल्या. हरी ओम स्वीट चौक, संभाजीनगर मार्गे, आळंदी रस्त्याने या पदयात्रेची सांगता माजी नगरसेवक सागर गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ करण्यात आली.
यावेळी महेश लांडगे म्हणाले की, आगामी काळात आळंदी आणि दिघी रस्ता वाहतूक कोंडी मुक्त करण्याचे नियोजन आहे. यासाठी या भागात वाहन तळ उभारून वाहतूक कोंडी सोडवण्याचे महत्त्वाचे काम करण्यात आले आहे. वाहनतळाची सोय नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा मिळेल त्या जागी वाहने उभी केल्याने भोसरीतील आळंदी रस्ता परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. यावर तोडगा म्हणून आळंदी रस्त्यालगत सखुबाई गबाजी गवळी उद्यानाजवळ बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला गेला. या वाहन तळाला नाव देताना या परिसरातील आमच्या गवळी कुटुंबियातील आमचा आधारस्तंभ असलेले कै. ज्ञानेश्वर सोपान गवळी यांचे नाव देण्यात आले.
आमदार लांडगे यांना विजयी करणार…
या वाहन तळामुळे या परिसरात येणाऱ्या आणि कुठेतरी गाडी लावण्यासाठी जागा शोधणाऱ्या वाहनचालकांना गाडी पार्क करायला हक्काची जागा मिळणार आहे. हे काम मी मी माझ्या सहकारी सदस्यांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात केले असल्याचे मला विरोधकांना ठणकावून सांगायचे आहे.
दरम्यान, येथील व्यापारी वर्गाने तसेच युवकांनी महायुतीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. महेश लांडगे यांनी शास्तीकर माफीचा प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक हाताळला आहे. ज्याचा लाभ शहरातील लाखो प्रॉपर्टी धारकांनी घेतला आहे. यामुळे महेश लांडगे यांना येत्या 20 नोव्हेंबर रोजी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करणारा असल्याचा विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.
दिघी व आळंदी रस्त्याचा वापर मुख्यत्वे चऱ्होली, आळंदी, चाकण, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे आदी भागांकडे जाण्यासाठी त्याचप्रमाणे या भागातून भोसरी, भोसरी एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड शहरात येण्यासाठी या केला जातो या वाहन तळामुळे दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दृष्टिक्षेपात आला आहे. त्यामुळे या कनेक्टिंग रस्त्यावरील वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे.