Horoscope Today दि. २७ मार्च ; आज वैचारिक दृष्टीकोन सुधारेल.. …. . ; पहा बारा राशींचं भविष्य

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. 20 मार्च ।।

मेष:-कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. खाण्या-पिण्याची हौस भागवाल. मनाजोगा आर्थिक लाभ होईल. गायन कलेत प्रगती होईल. घरासाठी काही वस्तु खरेदी कराल.

वृषभ:-आवडत्या कामात गुंग व्हाल. दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. महिलांची नटण्या-मुरडण्याची हौस पूर्ण होईल. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. चैनीत दिवस घालवाल.

मिथुन:-मानसिक चंचलतेला आवर घालावी. ज्येष्ठांची मनापासून सेवा कराल. एखादी चांगली संधि चालून येईल. दानधर्म करण्याचा योग येईल. तीर्थ यात्रेसाठी नाव नोंदवाल.

कर्क:-तुमची समाजप्रियता वाढेल. मित्रपरिवारात वाढ होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. कामात स्त्रियांची चांगली मदत मिळेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

सिंह:-कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. कामात स्थिरता ठेवावी. व्यावसायिक लाभाने खुश व्हाल. कामाच्या ठिकाणी विश्वास संपादन कराल. काही चांगल्या गोष्टी अनुभवास येतील.

कन्या:-धार्मिक कामात प्रगती कराल. योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. काही चांगल्या संधी चालून येतील. मुलांच्या व्रात्यपणाकडे लक्ष द्यावे. तुमच्यातील सुसंस्कृतपणा दिसून येईल.

तूळ:-अचानक धनलाभ होईल. लॉटरी मधून आर्थिक गरज भागेल. काही गोष्टी सहज घडून येतील. दिवस काहीसा आळसात घालवाल. फार हुरळून जाऊ नका.

वृश्चिक:-उत्तम वैवाहिक सौख्य राहील. दिवस मौज-मजेत जाईल. भागिदारीतून चांगला नफा मिळेल. तुमच्या संपर्क कक्षा रुंदावतील. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल.

धनू:-कामात काही क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. कामगारांचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. दिवस समाधानात जाईल. आरोग्यात सुधारणा होईल.

मकर:-बुद्धीचा सदुपयोग कराल. शैक्षणिक कामे सुरळीत पार पडतील. प्रेमसौख्याला बहर येईल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. जुगारात चांगला धनलाभ संभवतो.

कुंभ:-शांत झोपेचा अनुभव घ्याल. घराची छान सजावट कराल. घरगुती वातावरण आनंदी राहील. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. दिवस सुख-शांतीत जाईल.

मीन:-प्रवासाची आवड पूर्ण कराल. वैचारिक दृष्टीकोन सुधारेल. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. उत्तम साहित्य वाचनात येईल. भावंडांचे प्रेमळ सौख्य लाभेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *