Bad Cholesterol : वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ‘हे’ फळ गुणकारी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ एप्रिल ।। हल्ली पिअर्स, ड्रॅगन फ्रूट, किवी यासारखी फळेही आता घरोघरी रुळत आहेत. मोठ्या शहरांमध्ये एवोकाडो फळही लोकप्रिय होत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे आरोग्यासाठी असलेले त्याचे अनेक लाभ. विशेषतः वाईट कोलेस्टेरॉल म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी या फळाचे सेवन गुणकारी ठरू शकते, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आठवड्यातून किमान 1-2 वेळा तरी तुम्ही आहारामध्ये वा नाश्त्यामध्ये एवोकाडोचा वापर करावा. अ‍ॅव्होकॅडो अथवा एवोकाडो असा उच्चार असणारे हे फळ लोण्याप्रमाणे लागते. नुसते चविष्ट नाही, तर या फळाचा आरोग्यासाठी कमालीचा फायदा होतो. एवोकाडोमध्ये अनेक पोषक तत्त्वांचा समावेश आहे, जो अनेक रोगांपासून आपल्याला दूर ठेवू शकतो.

एवोकाडोमध्ये फायबर, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, एनर्जी, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, बी6, सी, ई, के, थियामिन, कॉपर, झिंक इत्यादी तत्त्वे भरभरून आहेत. त्यामुळेच याला ‘पॉवरहाऊस सुपरफूड’ असे म्हटले जाते. याशिवाय यामध्ये हेल्दी फॅटस्, अँटिएजिंग घटक आणि अँटिऑक्सिडंटस्देखील असल्याचे आढळते. एवोकाडोमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने वजन कमी करून नियंत्रणात आणण्याचे काम करते. तुमचे वजन भराभर वाढत असेल, तर तुम्ही आपल्या डाएटमध्ये एवोकाडोचा समावेश नक्की करून घ्यावा, असे तज्ज्ञ सांगतात. यामध्ये हेल्दी फॅटस् असून ते पोट भरलेले ठेवतात. लवकर भूक लागत नाही आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. सहसा नाश्त्यामध्ये याचे सेवन करावे.

हेल्दी हार्टसाठी एवोकाडोचे सेवन करणे हे उत्तम ठरते. हे फळ लिपिड प्रोफाईलमध्ये सुधारणा करून हृदय सुरक्षित ठेवते. तुम्ही रोज 5 आठवडे एवोकाडोचे सेवन केल्यास, शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत मिळते. हे बॅड कोलेस्टेरॉल कमी करून गुड कोलेस्ट्रॉल अर्थात एलडीएलचे प्रमाण वाढवते. जे लठ्ठपणाने ग्रस्त आहेत, त्यांना या फळाचा अधिक फायदा मिळतो. यातील पोटॅशियम हे एक प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंटचे उत्तम सोर्स असून, उच्च रक्तदाबही कमी करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *