साडेबारा टक्के जमीन परतावा मिळवून दिल्याबद्दल बारणे यांना सन्मान चिन्ह

Spread the love

थेरगाव, दि. 9 एप्रिल – पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक शेतकरी भूमिपुत्रांच्या साडेबारा टक्के परतावा मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल स्थानिक शेतकरी व भूमिपुत्रांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन खासदार श्रीरंग बारणे यांचा सत्कार करण्यात आला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवासस्थानी स्थानिक शेतकरी व भूमिपुत्रांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी माजी नगरसेवक शंकरराव पांढारकर, निलेश पांढारकर, कैलास कुटे, श्रीधर वाल्हेकर, बाळासाहेब वाल्हेकर, दिलीप पांढारकर, ॲड.राजेंद्र काळभोर, विशाल काळभोर आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परताव्याचा विषय प्रदीर्घकाळ प्रलंबित होता. खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्याचा सातत्याने पाठपुरावा करत नुकताच शासन आदेश (जीआर) जारी करण्यात यश मिळवले.

त्यामुळे स्थानिक शेतकरी व भूमिपुत्रांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. सर्वांनी खासदार बारणे यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला व निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *