Lonavala Records Hottest Day of Season: थंड हवेचे ठिकाण लोणावळा शहरात देखील गरमी ; उष्णतेने नागरिक हैराण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २० एप्रिल ।। गेल्या काही दिवसांपासून मावळातील वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात देखील गरमी जाणवू लागली आहे. हवामान खात्याच्या नूसार लाेणावळ्यात 38 अंश तापमानाची नोंद झाली. यंदाचे हे आत्तापर्यंत सर्वाधिक नाेंद झालेले तापमान आहे. उकाड्यापासून शरीराला थंडावा मिळावा यासाठी नागरिकांचा रसदार फळे, ताक, सरबत पिण्याकडे कल वाढू लागला आहे.

गेल्या दोन दिवसांत लोणावळा शहरातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. लोणावळा शहराचे तापमान सरासरी 38 ते 40 अंशा पर्यंत गेले आहे. पुणे जिल्ह्याप्रमाणेच लोणावळा शहरात देखील उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा व रात्री देखील वातावरणात उष्मा जाणवू लागला आहे.
वडगांव मावळ आणि आजूबाजूच्या परिसरात 41.3 अंश तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे सर्वत्र वातावरणात मोठा बदल झाला असून तापमानात वाढ होऊ लागली आहे. यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने उष्णता वाढली आहे.

पुढील एक आठवडा असेच तापमान राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी. महत्वाची कामे सकाळी व संध्याकाळी करावी, दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *