House Price: आता सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न आणखी महागणार; किमतीत होणार मोठी वाढ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ एप्रिल ।। स्वत:च्या मालकीचं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु आता सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न आता महागणार आहे. कारण गृहबांधणीच्या किमतींमध्ये ६ टक्क्यांनी वाढ होणार ( House Price) असल्याची माहिती लोकमतच्या हवाल्याने ‘जेएलएल’च्या अहवालातुन मिळत आहे. आता गृहबांधणीच्या किमतींमध्ये ६ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये घरांच्या किमतीत आता वाढ होणार आहे. मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये तेजी आली ( House Price Hike) आहे. त्यानंतर आता जेएलएल या बांधकाम विषयात काम करणाऱ्या कंपनीच्या एका अहवालातून गृहबांधणीच्या किमतींमध्ये किमान ६ टक्क्यांची वाढ होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे घर घेण्यासाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

घरांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्चा सामानाच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. याचाच परिणाम म्हणजे घर बांधणीच्या खर्चात वाढ होत आहे. परिणामी येणाऱ्या काळात (House Price In Mumbai) घरांच्या किमती वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. घरांच्या बांधणीसाठी स्टील, सिमेंट, वाळू, विटा हे आवश्यक घटक आहेत. त्यांच्या विक्रीदरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली (Housing Prices Mumbai) आहे. बांधकामाची मजुरी देखील वाढलेली आहे. बांधकामाच्या मूळ खर्चात मोठी वाढ होत असल्याचं दिसत आहे.

मागील वर्षी मुंबईमध्ये दीड लाख मालमत्तांची विक्री झाली (Housing Prices) होती. यामध्ये घरांचे प्रमाण ८० टक्के होते. उर्वरित २० टक्क्यांमध्ये व्यावसायिक मालमत्तांचा समावेश होता. मात्र ५ कोटी आणि त्यापुढील घरांचे एकूण विक्रीतील प्रमाण १५ टक्के होते. २०२३ या आर्थिक वर्षामध्ये बांधकाम उद्योगामुळे ६ कोटी रोजगार दिला गेला आहे. आता बांधकाम खर्चात वाढ झाल्यामुळे २०२४ मध्ये देखील आलिशान घरांच्या विक्रीत वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. देशात मोठ्या प्रमाणावर घर बांधणीचे प्रकल्प (Housing Prices Hike) सुरू आहेत. एकूण ७ कोटी १० लाख लोकं हे काम करत असल्याची माहिती मिळत आहे. यंदा बांधकाम उद्योगामुळे ७ कोटी रोजगार दिला असल्याचं दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *