महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी- नवी दिल्ली – दि. १३ ऑगस्ट – : : रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने जन्माष्टमीच्या मुहूर्तावर एक जबरदस्त ऑफर लाँच केली आहे. या ऑफरनुसार JioPhone 2 ला केवळ 141 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येणार आहे. या फोनची किंमत 2999 रुपये असून 2018 मध्ये लाँच करण्यात आला होता. याआधी कंपनीने 2017 मध्ये पहिला फिचरफोन जियोफोन (JioPhone) बाजारात आणला होता.
JioPhone 2 ची किंमत 2999 रुपये आहे. या फोनला आता कंपनी अधिकृत वेबसाईटवर 141 रुपयांच्या ईएमआयद्वारे विकत आहे. या फोनमध्ये 2.4 इंचाचा डिस्प्ले, 2000 एमएएचची बॅटरी, 4जी, क्वार्टी की पॅड आहे. याचसोबत 512 एमबीची रॅम आणि 4 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. हे स्टोरेज मेमरी कार्डद्वारे 128 जीबी वाढविता येते.
JioPhone 2 मध्ये मागे 2 मेगा पिक्सलचा कॅमेरा आहे. तर पुढे 0.3 मेगा पिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय या फोनमध्ये वाय फाय, जीपीएस आणि एनएफसीसारखे फिचर आहेत. या फोनवर व्हाट्सअॅप, युट्यूब, गुगल असिस्टंट आणि फेसबुकही वापरता येणार आहे.
jio चा JioPhone 5 येतोय
रिलायन्स जिओ लवकरच JioPhone 5 लाँच करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या फोनची फिचर लीक झाली आहेत. यानुसार कंपनी JioPhone 5 बाजारात आणऊ शकते. याची किंमत 500 रुपयांपेक्षाही कमी असणार आहे. यामध्ये JioPhone 2 सारखेच KAI ओएस मिळणार आहे. कंपनीने आतापर्यंत या फोनची लाँचिंग तारीख जाहीर केलेली नाही.