महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ फेब्रुवारी ।। राज्यातील हवामान शुष्क अन् कोरडे आहे. मात्र, तरीही उत्तरेकडील वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे थंडी पडण्याची शक्यता मावळली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच कडक उन्हाळा जाणवत आहे. रविवारी राज्याच्या काही शहरांचे तापमान 36 अंशांवर गेले होते.
यंदा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच थंडी जाणवली. राज्यातील पुणे, अहिल्यानगर, नाशिक याच ठिकाणी पारा 8 ते 9 अंशांपर्यंत खाली गेला होता. मात्र, बहुतांश भागांचा पारा 12 ते 15 अंशांवर होता. त्यामुळे यंदाचा हिवाळा थंडीविनाच संपला असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.
रविवारचे राज्याचे कमाल तापमान
पुणे (34.1),मुंबई (30.2),सोलापूर (36.4), वाशिम (36.4), ब्रम्हपुरी (36.2), अकोला (35.4), अमरावती (34.6), बुलडाणा (34), चंद्रपूर (34.6), गोंदिया (33.6), नागपूर (34.4), वर्धा (35), यवतमाळ (35), , अहिल्यानगर 34.2), जळगाव (32), कोल्हापूर (33), महाबळेश्वर (29.5), नाशिक (33.3), सांगली (34.4).
महाराष्ट्रातील उन्हाळा संपल्यासारखीच स्थिती तयार झाली आहे. उत्तर भारतात एकामागून एक पश्चिमी चक्रवात सक्रिय होऊनसुद्धा राज्यात थंडी नाही. कारण, उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्याबाहेरच अडले त्यांची दिशा सतत बदलल्याने यंदा राज्यात थंडीचे प्रमाण कमी राहिले. राज्यात आज सोमवारी (दि.3) व उद्या मंगळवारी (दि. 4 फेब्रुवारी) काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज आहे.