![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ फेब्रुवारी ।। अर्थसंकल्पानंतर आज सोमवारी 3 फेब्रुवारी रोजी सोने स्वस्त झाले आहे. आज सोने शिखरावरून थोडे खाली आले आहे. शनिवारी अर्थसंकल्पाच्या दिवशी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 84,500 रुपयांच्या वर होता.
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 150 रुपयांनी घसरला आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 84,400 रुपयांच्या आसपास आहे. सरकारने अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात वाढ केलेली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळला आहे.
सोने 84000 रुपयांच्या पुढे का?
जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि अमेरिकेच्या धोरणांमधील बदलांमुळे, गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत, ज्यामुळे सोन्याच्या किंमती वाढत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात व्याजदर कपात आणि अनिश्चितता कायम राहिल्यास सोन्या-चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय, भारतात लग्न आणि सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी स्वाभाविकपणे वाढते, त्यामुळे येत्या काही महिन्यांत त्यांच्या किमती आणखी वाढू शकतात.
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 150 रुपयांनी घसरून 84,6300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 77,590 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 84,480 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 77,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा भाव किती?
शनिवारी 3 फेब्रुवारी रोजी चांदीच्या भावात घसरण झाली. अर्थसंकल्पानंतर चांदीच्या भावात 200 रुपयांची घट झाली. चांदीची किंमत 99,400 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली आहे. यापूर्वी चांदीची किंमत 99,600 रुपये होती. चांदी 1,00,000 रुपयांच्या विक्रमी पातळीपेक्षा कमी आहे.
![]()
