महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. २६ मार्च ।। विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलपास करण्याची पद्धत आता बंद करण्यात आली आहे. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा नेहमीप्रमाणेच होणार आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात १८ तर आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २१ गुणांची अट घालण्यात आलीय. विशेष म्हणजे अचानकपणे कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका २० वर्षे जतन करून ठेवाव्या लागणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जायचे. परंतु आता ही पद्धत बंद केली आहे. विद्यार्थ्यांना आता परीक्षेत चांगले गुण मिळवावे लागणार आहे. जर विद्यार्थ्यांना कमीत कमी गुण मिळाले तरच त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. अन्यथा त्यांना नापास करण्यात येणार आहे.