महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ एप्रिल ।। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची नांगी ठेचण्याचा संकल्प केलाय. राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचा युद्ध अभ्यास सुरु आहे. तर राफेल आणि सुखोई विमानांचा ‘आक्रमण अभ्यास’ आता शेवटच्या टप्प्यात आहे. भारतीय हवाई दलाच्या युद्ध अभ्यासामुळे कराचीसह पाकिस्तान नेस्तनाबुत होण्याची भीती पाकिस्तानला सतावतेय. त्यातच दगाबाज पाकड्यांनी पुन्हा एलओसीवर गोळीबार करत आपली लायकी दाखवून दिली.
भारतानंही शत्रुला चोख प्रत्युत्तर दिलं. विशेष म्हणजे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदीही सीमेवर दाखल झालेत. त्यामुळे पाकड्यांना जन्मभराची अद्दल घडवण्याचा निर्धारचं आता भारतानं केलाय..आणि हीच युद्धाची नांदी ठरू शकते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत- पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढलाय. पाकिस्तानने एलओसीवरील सैन्य वाढवलंय. पाकिस्तानने सैन्याला बंकरमधून भारतावर नजर ठेवण्याची आदेश दिलेत.
रावळपिंडी हेडक्वार्टरला अर्लंट राहण्याचे आदेशही देण्यात आलेत. मात्र पाकड्यांनी कितीही उड्या मारल्या तरीही भारताच्या ताकदीपुढे ते निष्प्रभ ठरणार हे निश्चित आहे. समोरासमोर युद्ध करण्याची धमक नसलेल्या पळपूट्या पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसून पहलगाम हल्ला घडवून आणला हे स्पष्ट आहे. त्यामुळे भारताकडून होणाऱ्या कारवाईचा धसका पाकिस्तानने घेतलाय.
एलओसीवर गोळीबार करत पाकिस्तानने आपला नापाक मनसूबा दाखवून दिलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षविराम कराराबाबत प्रश्न उपस्थित होतायेत. भारत हा करार रद्द करून पाकिस्तानला त्याची जागा दाखवून द्यावी असा सूर देशभरातून उमटतोय.